मंगरूळ नाथ
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यान मध्ये महिला मंडळ योग ग्रुप द्वारे आयोजित सामूहिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन दैनिक योगसाधिका सौ. रेखाताई फुके, सौ. मंजुश्री ताई बरछा, सौ सुशीला ताई ढोकणे, सौ. बजाज, सौ.अंजनकर, लताताई मनवर, सौ खिराडेताई, कविताताई व्यवहारे, सौ.ममता बेलखडकर ,सोनियाताई राऊत, ज्योतीताई इंगळे, बनसोड मॅडम, सौ. ज्योतीताई खडसे, सौ मीनाक्षी डुबे, रमाताई भगत , यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाला महिला मंडळाची उपस्थिती 550 च्या जवळपास होती. उपक्रमाचे माध्यम एकच करा योग रहा निरोग क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यान मध्ये दैनिक निःशुल्क योग प्राणायाम वर्ग सुरू आहे. तरी सर्वांनी लाभ घ्यावा . महिला मंडळ योग ग्रुप च्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवल्या जात असतात.सौ. रेखाताई फुके यांनी हळदी कुंकू महत्त्व पटवून देताना आपले विचार व्यक्त केले
नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. महिला मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकूवाचा समारंभाचे आयोजन करतात. मकर संक्रांतीत हळदी कुंकूवाचा सण का साजरा करतात. पौराणिक कथेनुसार सुहासिनीमधील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण असतो. हळदीकुंकू करणे म्हणजे एकप्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे असं मानले जाते.
हळदीकुंकू आणि वाण देणे आदी विधीतून आपल्यावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास, तसेच ईश्वराप्रती जिवाचा भाव वाढण्यास साहाय्य होते. वाण देण्याची एक पद्धत आहे. वाण देतांना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात. वाण देणे म्हणजे दुसर्या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे होय. पदराच्या टोकाचा आधार देणे, म्हणजे अंगावरील वासनेच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे. वाणाच्या रूपाने दाही दिशांच्या माध्यमातून स्थळदर्शकरूपी सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्याग करणे असे म्हटले जाते. हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते म्हणजेच दान सत्कारणी लागते. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक सुवासिनी महिला संक्रातीमध्ये हळदीकुंकू करताना अगदी छोटंसं का होईना पण वाण देतात. संक्रातीला वाण देणे याचे अध्यात्मिक महत्त्व तर आहेच शिवाय वाण देवून आपण नात्यांमधील गोडवा देखील जपतो.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यान मध्ये महिला मंडळ योग ग्रुप द्वारे सामूहिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला
0 Comments