Ticker

6/recent/ticker-posts

गंगा किनाऱ्यावरच्या ‘मोनालिसा’चं पुढे

 सुधाकर चौधरी विशेष रिपोर्ट 

गंगा किनाऱ्यावरच्या मोनालिसाच खरं नाव मोनी भोसले. मूळ इंदूरची. रस्त्यावर फिरून रुद्राक्ष अन् गळ्यातल्या माळा विकणारी. दिवसभर चार-पाच माळा विकल्या तरच रात्री चूल पेटण्याची शाश्वती. मात्र, सोशल मीडियानं एका रात्रीत तिच्या गळ्यात ‘व्हायरल पॉप्युलॅरिटी’ची भलीमोठी माळ घातली आणि ती रातोरात खूप मोठी फेमसही झाली. यंदाच्या महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीच्या बरोबरीनं या मोनालिसाचेच व्हिडीओ व्हायरल झाले. कुठल्या तरी लोकल चॅनलवाल्यानं तिची सहज म्हणून मुलाखत घेतली अन् ती पाहता-पाहता लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचली.  तिचे डोळे निळे, म्हणून मीडियानं मोनीऐवजी तिला नाव दिलं मोनालिसा. लिओनार्दो द विंचीच्या अजरामर 
 ब्यूटिशियन्सनी तिचं रूप बदलवलं.

‘मोनालिसा’सोबत या तरुणीची तुलना केली गेली.  ‘ब्लॅक ब्यूटी’ शब्द जगाला ठाऊक होता; मोनालिसाने ‘ब्राऊन ब्यूटी’ हा शब्दही फेमस करून टाकला. तू छोटा हा मोठा हा भेदभाव कशासाठी 
तिच्या प्रत्येक व्हिडीओला जबरदस्त रिस्पॉन्स मिळतोय, हे लक्षात येताच प्रयागराजमधल्या तिच्या राहुटीजवळ ‘डिजिटल इन्फ्लुएन्सर’ची रांग लागली. तिच्यासोबत सेल्फी काढण्यापेक्षाही तिला वेगवेगळ्या विषयांवर बोलतं करण्याची अहमहमिका सुरू झाली. सुरुवातीला लाजत-बावरत हळूच उत्तरं देणारी मोनालिसाही अवघ्या तीन-चार दिवसांत कॅमेऱ्यांना सरावली. आपण काहीही बोललो तरी तत्काळ व्हायरल होतो, हे लक्षात येताच तिच्या देहबोलीत सराईतपणा येऊ लागला. 
सुरुवातीला तिच्या घरच्यांनाही गंमत वाटली. गमतीचं रूपांतर हळूहळू कौतुकात झालं. अशातच एका दिग्दर्शकानं तिला एका चित्रपटात नायिकेचीही भूमिका देऊ केली. काही ब्यूटिशियन्सनी तिचं रूप बदलवलं. एका रात्रीत तिचा ‘मेकओव्हर’ झाला; मात्र तिचा हा ‘अवतार’ बऱ्याच फॉलोअर्सना आवडला . सावळ्या रंगातलं अन् निळ्या डोळ्यांतलं तिचं अस्सल गावरान सौंदर्यच लोकांना आवडल होतं.
 एकेक व्हिडीओला तीन-चार कोटींचे व्ह्यूज मिळू लागले. आपण एका रात्रीत स्टार बनलोत, याची पुरेपूर जाणीव झालेली मोनालिसा मग स्वत:ही रील्स बनवू लागली. हे इतकं होताहोता कुटुंबाच्या पोटात खड्डा पडायला लागला. घरचे भानावर आले. तिचा व्हिडीओ काढणाऱ्याला दहा हजार लाइक्स मिळाले तरी तिचे दहा रुपयांचे साधे मणीही कुणी विकत घेईना. केवळ ‘व्हायरल व्हिडीओं’नी पोट भरत नाही,  पोटासाठी रस्त्यावर भटकणाऱ्या मंडळींनाही ‘व्यक्तिगत खासगीपण’ असतं, याची कडवट जाणीव झालेल्या कुटुंबानं तिच्या तोंडावर कापड टाकून तिला तिथून हलवलं. अख्खं कुटुंब मूळ गावी परतलं. तिचं रोजचं नवं दर्शन होईनासं झालं तरी जुनेच व्हिडीओ फिरवून-फिरवून नवे केले जाऊ लागले. हे कमी पडलं की काय म्हणून एआयची मदत घेऊन तिचे शेकडो व्हिडीओ बनवले गेले. तिच्या नावानं तयार झालेल्या कैक फेक अकाउंट्सना लाखो फॉलोअर्स मिळाले. तिला बॉलिवूडच्या एका सिनेमाची ऑफर आलीय आणि राजकुमार रावचा भाऊ तिचा ‘हिरो’ असणार आहे, अशीही बातमी आली. तिचं खरे-खोटेपण काही दिवसात कळेलच  मोनालिसा  ब्लॅक ब्यूटी’ झाली हे सत्य नाकारता येणार नाही.
तोंडावर कापड टाकून तिला तिथून  अख्खं कुटुंब मूळ गावी परतलं. 

आता उत्सुकता एवढीच की, या कहाणीचा शेवट काय? मोनालिसाचाही राणू मंडल होणार का?  कारण एका रात्रीत झपाट्यानं व्हायरल झालेली अनेक मंडळी नंतर कोनाड्यातल्या पालापाचोळ्यासारखी अडगळीत पडतात, हा आजपर्यंतचा इतिहास. खरं तर हा विषय मोनालिसा किंवा राणूचा नाही.  सोशल मीडियात खूप मोठी ताकद आहे. कोणाला कुठल्या स्थानी नेऊन ठेवेल याची कल्पनाही करू शकत नाही. ही आहे खरी सोशल मीडियाची ताकद आहे यात काही शंका नाही.

Post a Comment

0 Comments