Ticker

6/recent/ticker-posts

य.च.सैनिक शाळेत फुलली परसबाग


  
  केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये परसबाग निर्माण करून सदर परसबागमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांच्या समावेश शालेय पोषण आहारामध्ये करावयाचे निर्देश देण्यात आल्यानंतर शहरी व ग्रामीण भागात उपलब्ध जागेनुसार शाळेत परसबाग निर्मिती  करण्यास सुरुवात झाली. परसबाग निर्मितीचा उद्देश विद्यार्थ्यांचे निसर्गाशी जवळीकता निर्माण व्हावी याच उद्देशाने यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा सुपखेला वाशिम येथे परसबाग निर्मिती करण्यात आली. शाळेचे प्राचार्य एम एस भोयर, उपप्राचार्य एस बी चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक पी व्ही पवळ,उपस्थित होते.
          
 शाळेच्या उपलब्ध परिसरात परसबागेत वांगे,कोबी,टोमॅटो,गाजर मेथी,कोथिंबीर,चवळी इत्यादीची लागवड करण्यात आली आणि कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खते किंवा फवारणी न करता हा भाजीपाला घेण्यात येतो.या पालेभाज्यावर सेंद्रिय खते वापरून आमचे विद्यार्थी या परसबागेमधून पालेभाज्या काढत आहेत.त्यामुळे विद्यार्थी चौकटी बाहेर जाऊन विचार करू लागला व या प्रकारचीच परसबाग तो आपल्या घरच्या परिसरात सुद्धा तयार करील. परसबागेत पाण्याची ठिबक सिंचनाने व्यवस्था करण्यात येते.सदर उपक्रम राष्ट्रीय हरित सेना व गांधी रिसर्च फाउंडेशन यांचे विद्यार्थी व सदस्य एस एस मोळके,व्ही एम जाधव,बी व्ही देशमुख,एक आर खांदवे,आर ए सरनाईक कु.डी पी पाटील,एन ए पडघान,बी डी सोनटक्के,रामचंद्र ठाकरे,अब्दुल गौरवे एस के कळसरे,पुंडलिक फलटणकर,मंगेश डुकरे,अंकुश ठाकरे,गोवर्धन लोखंडे,संतोष वानखडे,महादेव वानखडे यांच्या परिश्रमातून परसबाग फूलली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे व शिक्षक सदस्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.सुभाषरावजी ठाकरे साहेब माजी राज्यमंत्री तथा संस्थेचे सचिव मा. चंद्रकांत ठाकरे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद वाशिम शाळेचे प्राचार्य एम एस भोयर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.असे प्रसिद्धी प्रमुख रमेश रावसिंग पडवाळ यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments