प्रतिनिधी श्रावणी कामत
२०:३० वाचे सुमा मौजे कामशेत ता. मावळ जि.पुणे गावचे
हददीत इसम नामे सुभाष रतनचंद गदिया रामदिया कॉम्पलेक्स, कामशेत ता. मावळ जि.पुणे यांने गदिया
कॉम्पलेक्स येथील एका खोलीत पेट्रोल सदृष्य व रॉकेल सदृष्य ज्वलंतशिल द्रव्य पदार्थाचा अवैद्य साठा करून
ठेवला असलेबाबत सहा. पोलीस अधिक्षक श्री सत्यसाई कार्तिक सो यांना गोपनीय बातमीदृवारा मार्फत बातमी
मिळालेने सदर ठिकाणी छापा कारवाई करणेबाबत आदेश झालेने सदर मिळालेले गोपनीय बातमीचे आधारे
सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी मानवी जिवीतास धोका होणेचा संभव असतानाही
सुरक्षिततेबाबत योग्य ती दक्षता न घेता, हयगयीने व निष्काळजी पणाने अवैध साठा केलेने अत्यावश्यक वस्तु
अधिनियमाचे उल्लंघन केलेने त्यावरून संबंधित इसम सुभाष रतनचंद गदिया रामदिया कॉम्पलेक्स, कामशेत
ता. मावळ जि. पुणे कामशेत पोलीस स्टेशनला गु.र.नं. २९/ २०२५ भारतीय न्याय संहिता अधिनियम सन २०२३ वे
कलम २८७ सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम सन १९५५ चे कलम ३.७ प्रमाणे गुन्हा रजि. दाखल आहे.
सदर गुन्हयात घटनास्थळी मिळून आलेला ज्वलंतशील पेट्रोल सदृष्य व रॉकेल सदृष्य मालाचे
वर्णना खालीलप्रमाणे....
१) २०,००० एक पिवळे रंगाचा अंदाजे २२० लिटर मापाचा प्लास्टिकचा बॅरल त्यामध्ये अंदाजे २०० लिटर
मापाचे पेट्रोल सदृष्य द्रव्य पदार्थ किंमत अंदाजे
२) १८००० /- एक निळे रंगाचा अंदाजे २०० लिटर मापाचा प्लास्टिकचा बॅरल त्यामध्ये अंदाजे १८० लिटर
मापाचे पेट्रोल सदृष्य द्रव्य पदार्थ किंमत अंदाजे
३) १८००० / - एक निळे रंगाचा अंदाजे २०० लिटर मापाचा प्लास्टिकचा बॅरल त्यामध्ये अंदाजे १८० लिटर
मापाचे पेट्रोल सदृष्य द्रव्य पदार्थ किंमत अंदाजे.....
४) १८०००/- एक लोखंडी अंदाजे २०० लिटर मापाचा सिल्वर रंगाचा बॅरल त्यामध्ये अंदाजे १८० लिटर मापाचे
पेट्रोल सदृष्य द्रव्य पदार्थ किंमत अंदाजे
५) २१००/- एक निळे रंगाचे ३५ लिटर मापाचे प्लास्टिकचे कॅन त्यामध्ये ३५ लिटर मापाचे रंगहीन रॉकेल
सदृष्य द्रव्य पदार्थ एकुण
किंमत
६) २१००/- एक निळे रंगाचे ३५ लिटर मापाचे प्लास्टिकचे कॅन त्यामध्ये ३५ लिटर मापाचे रंगहीन रॉकेल
सदृष्य द्रव्य पदार्थ एकुण किंमत
७) २१००/- एक निळे रंगाचे ३५ लिटर मापाचे प्लास्टिकचे कॅन त्यामध्ये ३५ लिटर मापाचे रंगहीन रॉकेल
सदृष्य द्रव्य पदार्थ एकु किंमत
८०,३००/- येणेप्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा माल जप्त केलेला आहे.
सदरची कामगिरी मापंकज देशमुख सो, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण तसेच अपर पोलीस
अधिक्षक श्री रमेश चोपडे सो, सहा पोलीस अधिक्षक श्री सत्यसाई कार्तिक सो यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस
निरीक्षक, रविंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शेडगे, सहा पोलीस उपनिरीक्षक नितेंद्र कदम, पोलीस
अंमलदार समिर करे, पोकॉ/ मारकड, पोकॉ/ माळवे, पोकॉ/ गारगोटे, पोकॉ, ठाकुर, चापोकों रविद्र राउळ तसेच तहसिल
कार्यालय, वडगांव मावळ येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री तुषार तुकाराम तनपुरे व पुरवठा निरीक्षक संदिप
प्रकाश तनपुरे यांचे समक्ष केलेली आहे.
0 Comments