Ticker

6/recent/ticker-posts

मानोरा येथील हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्राला 6 फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ

स्थानिक:- मानोरा येथील स्वर्गीय भीमराव पाटील कापूस प्रक्रिया सहकारी संस्थांच्या गोडाऊनमध्ये शासकीय हमीभावाने नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून 31 जानेवारीला मुदत संपल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे सोयाबीन अजून घरात पडून असल्याने शासनाने सहा फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.मानोरा येथे स्वर्गीय भीमराव पाटील कापूस प्रक्रिया सहकारी संस्थेच्या गोडाऊनमध्ये नाफेडमार्फत जे एन कृषी प्रोडूसर कंपनी कारंजा संचालक अंशुमन जाधव यांना शासकीय हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी परवाना देण्यात आले आहे तालुक्यातील 800 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री करिता ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यात आली आहे 15 ऑक्टोंबर ते 31 जानेवारी या अडीच महिन्याच्या कार्यकाळात अर्धे शेतकऱ्यांची सोयाबीन मोजण्यात आली नसल्यामुळे घरात पडून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पुन्हा बाजार भाव प्रमाणे कमी दरात विक्री होणार का? असा विविध असलेल्या शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला असून 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत वूर्वरीत शेतकऱ्यांचे सर्व सोयाबीन मोजून घेण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होती. शेतकरी बांधवांविषयी तळमळ, आपुलकी,आस्था असल्यामुळे सबंधित शेतकरी बांधवांच्या वतीने ग्रेडर अंशुमन जाधव यांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले व या निर्णयामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments