प्रतिनिधी श्रावणी कामत
लोणावळा.
कैवल्यधाम योग संस्थेत गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी प्रामाणिक आणि वचनबध्द
विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या 3 वर्षाच्या प्राणायाम शिक्षक प्रशिक्षण कोर्स चा
समारोप समारंभ गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी कैवल्यधाम संस्थेचे सन्मानीय अध्यक्ष
डॉ. ओम प्रकाश तिवारी, संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी,
तसेच कोर्सचे शिक्षक व मार्गदर्शक श्री सुधीर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या
" मनन हॉल" मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व विद्यार्थ्यांचे भारतीय परंपरेनुसार औक्षण करून शांती पाठाने करण्यात
आली. सुरुवातीस श्री सुधीर तिवारी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. ओम प्रकाश तिवारी यांनी आशीर्वादपर
भाषण केले. यानंतर उपस्थित सर्व विदेशी विद्यार्थ्यांनी आपले कोर्समधील अनुभव तसेच मनोगते
व्यक्त केली.
कोर्स मधील सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, शाल आणि पतंजली मुद्रा
देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी योग शिक्षक, प्राणायाम शिक्षक प्रशिक्षण कोर्स चे विद्यार्थी तसेच लोणावळ्यातील पत्रकार
उपस्थित होते.
श्री सुधीर तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेल्या या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये
विदेशातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 2019 साली सुरु झालेला हा कोर्स कोव्हीड च्या
काळात लांबला गेला होता परंतु विदेशी विद्यार्थ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे 2025 साली
यशस्वीरीत्या पुर्ण झाला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोर्सच्या समन्वयक श्रीमती शालिनी श्रीवास्तव यांनी केले तसेच श्री सुबोध
तिवारी यांनी आभार प्रदर्शन केले.
हा कोर्स यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी कैवल्यधाम संस्थेच्या योग शिक्षिका ईशविंदर कौर, देबश्री
गांगुली यांचे विशेष सहकार्य लाभले.
0 Comments