Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील 13 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; मंत्रालयात दुसऱ्यांदा अधिकाऱ्यांच्या बदलीचा धडाका

महाराष्ट्र सरकारने  13  IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. मंत्रालयात दुसऱ्यांदा अधिकाऱ्यांच्या बदलीचा धडाका पहायला मिळाला आहे. यापूर्वी वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 2 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील 10 मोठ्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या होत्या. विविध प्रकरामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. 

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी

  1. प्रवीण दराडे प्रधान सचिव, (सहकार आणि विपणन), सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
  2. पंकज कुमार यांची सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  3. नितीन पाटील सचिव, राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई यांची आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  4. श्वेता सिंघल महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या सचिव यांची अमरावती विभागातील विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  5. डॉ. प्रशांत नारनवरे सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांना महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सचिव, मलबार हिल, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  6. अनिल भंडारी सह मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC, मुंबई यांना संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  7. पी.के. डांगे आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई यांना सचिव, राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  8. एस. रामामूर्ती  सचिव, शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई यांना महाराष्ट्राच्या राज्यपालांचे उपसचिव, मलबार हिल, मुंबई येथे नियुक्त करण्यात आले आहे.
  9. अभिजित राऊत  जिल्हाधिकारी, नांदेड यांना सहआयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  10.  मिलिंद कुमार साळवे  सहआयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर यांची आयुक्त, अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  11.  राहुल कर्डिले  सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई यांची नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  12. माधवी सरदेशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, कल्याण-डोंबिवली यांना संचालक, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  13. अमित रंजनसहाय्यक जिल्हाधिकारी, चार्मोशी उपविभाग, गडचिरोली यांना प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments