मंगरुळनाथ
नाथ नगरीतील नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रक्तदाता सामाजिक बहूउद्देशीय संस्था यांचेवतीने "सन्मान रक्तदात्यांचा"या कार्यक्रमाचे आयोजन 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून श्री.चारभूजानाथ संस्थान सभागृह येथे करण्यात आले होते.या सामाजिक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिवरक्षक दिपक सदाफळे (मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन)तर उद्घाटन श्रीमती विद्याबाई भारस्कर यांचेहस्ते करण्यात आले तर मान्यवरांचे हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेचे पुजन व हारार्पण करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर बाळासाहेब धोटे (जेष्ठ पदाधिकारी विद्युत संघटना) माणिकरावजी गंगावणे (अध्यक्ष,बळीराजा संघर्ष समिति) राजुभाऊ कांबळे (सर्वधर्म आपात्कालीन मित्र मंडळ) श्रीमती लताताई बजाज(माहेश्वरी महिला मंडळ) श्रीमती चंचल खिराडे (ज्ञानकाशी कॉंव्हेंट) यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमामधे रक्तदाते सुनिलभाऊ मालपाणी यांचा 50 पेक्षा जास्तवेळा रक्तदान केल्याबाबत तर राहूल रघुवंशी,पवन सारडा, राजेश भारस्कर,विजय लोहिया, पुंडलीक गादेकर,आनंद बंग यांचा 25 पेक्षा जास्त वेळा रक्तदान केल्यानिमीत्त संस्थेतर्फे विषेश सत्कार मान्यवरांचे हस्ते सन्मानपत्र , मेडल व बुके देवून करण्यात आला तसेच सौ.सविता गुप्ता,सौ.संगिता बाहेती, सौ.नयना पाटील,सौ.पिंकी गुप्ता,डॉ.महादेव बुरे, संतोष मांडवगडे, विजेंद्र गुप्ता,रमन शर्मा,अतुल ऊमाळे,शाम राऊत,सतीष टेटवार,सुमित डावरे,सागर कडूकार,निरज बजाज यांचेसह 50 पेक्षा जास्त रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला.प्रास्ताविक भाषणात राजेश भारस्कर यांनी रक्त हे कुठल्याच कंपनीत तयार होत नसल्यामुळे व दिवंसेदिवस रक्ताची मागणी वाढत असल्यामुळे नेहमीच रक्तदान करणार्या रक्तदात्यासोबतच नवीन रक्तदाते तयार होणे गरजेचे असून महिलांनीसुद्धा यामधे आता पुढाकार घ्यावा असे मत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना पवन सारडा यांनी आपण निरंतर रक्तदान करीत असून सन्मान रक्तदात्यांचा हा कार्यक्रम नाथ नगरीत प्रथमच होत असल्याचे व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले.याप्रसंगी सर्व मान्यवरांनी प्रसंगानुरुप मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाचे कौतूक केले. अध्यक्षीय भाषणात दिपक सदाफळे यांनी रक्तदानाचे महत्व विषद करुन रक्तदात्यांमुळेच रग्नांचे जिव वाचविण्यास मदत होते असे मत व्यक्त केले व ईतर विषंयावर सुध्दा सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन जयवंत पजई यांनी तर आभार प्रदर्शन राजेश भारस्कर यांनी मानले.या कार्यक्रमास देवराव महल्ले महाराज व डॉ.सिद्धार्थ देवळे यांनी भेट देवून शुभेच्छा दिल्यात.कार्यक्रमास राजेश कातखेडे, सुधाकर क्षिरसागर, अजय ढोक, संतोष शेटे,ससाने सर, मायाताई केदार,सुरेखा वानखडे,मंगला भारस्कर,स्नेहा देशमुख,किशोर पंडित,गोपाल खिराडे, गजानन पाटील यांचेसह बहूसंख्य नागरिक, रक्तदाते उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली.
0 Comments