Ticker

6/recent/ticker-posts

परिवहन विभाग बनला भ्रष्टाचाराचा अड्डा, कोट्यावधींचा महसूल बुडतोय "......... मल्लिकार्जुन पुजारी




 
वार्ताहर : अनंतराज गायकवाड 
वाशी, नवी मुंबई.

 राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन पुजारी यांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या भ्रष्ट कारभारावर सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री दत्ता सांगोलकर यांना निवेदन दिले आहे. 

पुजारी यांच्या म्हणण्यानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी ट्रक, डंपर, कंटेनर अशा  मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची रेलचेल मोठ्या प्रमाणात दिसून येते परंतु वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून क्षमतेपेक्षा माल ओव्हरलोड करणे व याला आळा घालण्यासाठी असणारी प्रादेशिक वाहतूक विभाग यंत्रणा ही दलालामार्फत भ्रष्टाचार करीत आहे. यामुळे सरकारचा महसूल तर बुडतच आहे. तसेच ओवर लोडिंग मुळे वाहनचालक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत तसेच काही वेळेस त्यांना प्राणासही मुकावे लागत आहे. 
परंतु कामगारांची परवा न करता इंद्रजीत सहाना अरविंद गिरी, जाफरभाई, इरफान भाई, एस. के. कदम यांच्यासारखे दलाल व काही भ्रष्ट अधिकारी गडगंज श्रीमंत झाले. आहेत. 

अशा असामाजिक भ्रष्ट प्रवृत्तीला सरकारने वेळीच कारवाई करून आळा घालावा या आशयाचे  पत्र युवा नेते शिवशरण पुजारी व मल्लिकार्जुन पुजारी यांच्या हस्ते दत्ता सांगोलकर यांना देण्यात आले.

Post a Comment

0 Comments