अकोला......
अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेवक माननीय गजानन ओंकार हरणे राहणार जिल्हा परिषद नगर खडकी अकोला यांची राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास च्या अकोला जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच त्यांच्या पस्तीस वर्षाच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्याच्या दृष्टीने त्यांचा मराठा सेवा संघ कार्यालय अकोला येथे दिनांक 5 जानेवारीला सर्व सामाजिक संस्था संघटना व सर्व पक्षांच्या संयुक्त विद्यमान सत्कार गौरव करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय संघटक दादाराव पाथरीकर, मराठा सेवा संघाचे राज्यकोषाध्यक्ष अशोक पटोकार, जिल्हाध्यक्ष प्रशांत जानोरकर, अखंड मराठा सेवा संघाचे समन्वयक राजेश देशमुख, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंगेश काळे, नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, मराठा महासंघाचे विनायक पवार, राम मुळे, सुरेश ठाकरे,देशमुख समाजाचे दिलीप देशमुख, संजय देशमुख, संभाजी ब्रिगेडचे पंकज जायले, निर्भय बनो जण आंदोलनाचे डॉ.कृष्ण वक्टे, नंदकिशोर गावंडे, राष्ट्रवादीचे शामराव वाहूरवाघ, समाजसेवक शौकत अली शौकत, वंचित बहुजन आघाडीचे प्रदीप चोरी, बचपन बचाओ संघटनेचे बाळू पाटील, काँग्रेसच्या पूजा काळे, सोनाली मोरे, तसेच विविध सामाजिक संघटनेचे ओमप्रकाश बेले, पवन देशमुख, माधव राखोंडे, राजू शिंदे, संतोष इंगळे, पत्रकार संघटनेचे सदानंद खारोडे, राजेश खारोडे आदी विविध राजकीय पक्षाचे व सामाजिक संघटनेचे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्रा.दादाराव पाथीकर आभारप्रदर्शन प्रदीप खाडे यांनी केले.
0 Comments