राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासच्या राळेगणसिद्धी कार्याध्यक्षा कल्पनाताई इनामदार,संघटन मजबूत करायचे असेल तर कार्यकर्त्याचे आचार विचार शुद्ध असावे तर कार्यकर्त्यांच्या शब्दाला वजन येते आपण सर्वांनी प्रत्येकाच्या जिल्ह्यात जाऊन जिल्हा संघटनाचे व तालुका संघटनाचे काम करावे लोक आंदोलन न्यास ने जो विश्वास आपल्या कार्य प्रणालीचा विचार करून पुढील कार्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या कल्पनाताई इनामदार बोलताना म्हणाल्या की जन आंदोलनामुळे देशाला आणि राज्याला माहितीचा अधिकार, ग्रामसभेला जादा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा, ग्रामरक्षक दल, जन लोकपाल कायदा, यांसारखे दहा कायदे जनतेला मिळाले.
व अशातच काही बहादरांनी माहितीच्या अधिकाराचा फायदाही करून घेतला परंतु ते आता खपवून घेतले जाणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात आता आपल्या सर्वांची नियुक्ती करून लोक आंदोलन न्यासाच्या महाराष्ट्र राज्यातील कार्यकर्ता बैठकीसाठी राज्यातील जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते राळेगणसिद्धी येथे उपस्थित होते. लोक आंदोलनाचे अध्यक्ष पद्मभूषण अण्णासाहेब हजारे,लोक आंदोलन न्यासाच्या कार्याध्यक्षा श्रीमती कल्पनाताई इनामदार, सचिव अशोक सब्बन, खजीनदार दत्ता आवारी, विश्वस्त दगडू मापारी, लक्ष्मण मापारी, अन्सार शेख सामाजिक कार्यकर्ते गजानन हरणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
यावेळी संघटन बांधणीबाबत विस्ताराने चर्चा करण्यात आली. आलेल्या प्रत्येक प्रमुख कार्यकर्त्यांनी आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली. बैठकीमध्ये जिल्हास्तरावरील, आणि तालुकास्तरावरील समित्यांबाबत चर्चा होऊन जिल्हाध्यक्ष पद निवडीबाबत सूचना मांडली. सदर बैठकीअंती असा ठराव करण्यात आला की, जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यकर्त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले . सदर बैठकीसाठी विकास गाजरे, रामदास सातकर, मनोज मुठे, गोविंद नलगे इत्यादींनी सहकार्य केले.
0 Comments