नामदेव महिला परिषदेतर्फे शुभेच्छा आणि अध्यक्षिय पदाचे स्वागत करण्यात आले.अमरावती येथे नुकत्याच झालेल्या सभेमध्ये भास्कर दादांची अध्यक्ष पदावर सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. शिंपी समाज हा विस्तारित आहे. अनेक पोट जातींनी युक्त म्हणजे नामदेव शिंपी समाज ,कापड तयार करणे, शिलाई करणे ,आणि विक्री करणे इत्यादी विविध व्यवसाय पण एकमेकास पूरक असे आहेत .परंतू हा शिंपी जातीचा जातिवंत व्यवसाय. खरंतर कमी भांडवलाचा ,पण आज खूप पैसा मिळवून देणारा असा व्यवसाय आहे .शिंप्याने कापड कापताना चूक झाली तर, ती शिवताना केलेली दुरुस्ती म्हणजे फॅशन होते.म्हणून या शिंप्याला आधुनिक भाषेत फॅशन डिझायनर या नावाने संबोधले जाते .असा व्यवसाय पुन्हा नव्याने जातीत रुजवण्यासाठी .नावारूपाला आणण्यासाठी .जाणकार अभ्यासू तन-मन-धनाने कार्य करणारी युवा कार्यकारणी तयार व्हावी. तीही जुन्या पिढी च्या जाणकारांच्या मदतीने, मार्गदर्शनाच्या सहकार्याने उभी रहावी.श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांनी भारतभर भ्रमण करून समता ,बंधुता, एकत्रीकरण रूजवले.त्यांच्या साहित्यातून दिसते आहे.जातिय समभाव ,धर्माचा प्रसार केला.त्यांच्याच प्रेरणेने सर्व पोट जाती एकत्र याव्यात म्हणून अखिल भारतीय क्षत्रिय महासंघाची स्थापना 44 वर्षांपूर्वी करण्यात आली होती .अनेक दिग्गजांनी आपले योगदान दिले आहे. आपापल्या परीने समाज घडवण्यासाठी समाजकार्य केलेले आहे. आज या समाजाची धुरा युवा नेते भास्कर दादा टोम्पे साहेबांच्या हाती देण्यात आली. बरेच सामाजिक प्रश्न मोठ्यांचे मार्गदर्शन, युवा कार्यकारिणी तयार करून ते करतीलच .श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचे स्मारक महाराष्ट्रातील पंढरपूर येथे साकार व्हावे .यासाठी अनेक वर्ष अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आजतागायत पाठपुरावा केला होता. ते आता पूर्णत्वास येईल. त्याचप्रमाणे बऱ्याच वर्षापासून या समाजाला आर्थिक महामंडळ मिळावे ही महत्त्वाची बाब समाज बदलासाठी आवश्यक होती. तीही आता पूर्णत्वास येत आहे. महाराजांचे नाव अनेक रस्त्यांना देण्यात यावे. नामदेव महाराजांचा ग्रंथ शासकीय असावा या सप्तशत्कोत्तरीत अशी अनेक कार्य पूर्ण व्हावीत. अनेक प्रश्न मार्गी लागावे .यासाठी अमरावती येथे ही सभा संपन्न झाली .त्यामध्ये 18 राज्यातून प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. आमच्या नामदेव महिला परिषदेतर्फे परिषदेच्या विश्वस्त उषाताई पोरे .सदस्य मीनल कुडाळकर. आणि सदस्य शर्मिलाताई खांडके .याही महिलांच्या वतीने उपस्थित होत्या. महिलांना अन्यन साधारण महत्व आहे .आणि त्यांनाही समाजकार्यात सहभागी होऊ द्यावे .असे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष भास्कर दादा टोम्पे यांनी केले.महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व राज्यातील, नामदेव महिला परिषद,महाराष्ट्रातील नामदेव समाजोन्नती परिषद संस्थां पदाधिकाऱ्यांनी
दादां चा पुष्पहार, पुष्पगुच्छ शाल श्रीफळ व शब्द सुमनांनी सत्कार करण्यात आला . या सभेचे आयोजन अनंत भाऊ जांगजोड, ईश्वर भाऊ धिरडे, प्रविण खोडे आणि अमरावती वासियांनी अत्यंत छान केले.
0 Comments