आमदार, शामभाऊ खोडे, मंगरुळपीर- , रास्त भाव दुकानदार यांनी दिले निवेदन.गेली अनेक वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारकांच्या मागण्या, अडीअडचणी व समस्या यांची सोडवणूक करण्याकरिता महाराष्ट्र राज्यामध्ये शासन स्तरावरून कोणतीही कार्यवाही झालेली नसून, त्या अनुषंगाने कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दि. 10 जानेवारी, 2024 रोजी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवेळी राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या तसेच मार्जिनमध्ये 50 रुपये इतकी वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे सुतोवच मंत्र्यांकडून त्या बैठकीत करण्यात आले होते. परंतु, आजपर्यंत या विषयाबाबत कोणताही निर्णय झाला नाही.
मागील 08 (आठ) वर्षापासून रास्त भाव दुकानदारांचे कमीशनमध्ये वाढ केलेली नाही. रास्त भाव दुकानदारांनी कमीशन वाढीसाठी अनेकवेळा निवेदन दिले तसेच हिवाळी आधिवेशन नागपूर येथे दि.11/12/2023 रोजी महाराष्ट्र राज्य रास्तभाव दुकानदार संघटने तर्फे निवदेन देण्यात आले होते. परंतु अद्यापही त्याबाबत काही निर्णय झाला नाही, हि खेदाची बाब आहे. सद्या महागाईच्या काळात मिळणारे कमीशन (प्रती क्विटल 150/- फक्त) अतिशय कमी असुन यामध्ये कुटुंबाचे पालनपोषण करने अत्यंत अवघड झाले आहे. त्याबाबत त्वरीत निर्णय घ्यावा व कमिशनमध्ये रु.150/- ने वाढ करुन प्रती क्विटल 300/- प्रमाणे कमिशन देण्यात यावे. आमदार, शामभाऊ खोडे यांना, रास्त भाव दुकानदार यांनी दिले निवेदन.
शासकीय नियमांनुसार धान्य गोदामातून येणाऱ्या धान्याच्या गोणी वजनात 50 किलोपेक्षा कमी नसाव्यात, तसेच देण्यात येणारे धान्य हे स्वच्छ व मनुष्यास खाण्यासाठी योग्य असावे असावे, अस्वच्छ आणि खराब धान्याचा पुरवठा करण्यात येऊ नये. ही निरंतर प्रक्रिया असायला हवी, त्यासाठी वेळेचे बंधन नसावे, तसेच ई-केवायसी व मोबाईल सीडींग, रेशनकार्ड मधील प्रत्येक लाभार्थ्यांची आधार क्रमांकासह पडताळणी अर्थात ई- केवायसी करणे करण्यासाठी प्रति सदस्य किमान ३० रुपये इतके लाभा देण्यात यावा. आदींसह संपूर्ण राज्यामध्ये एनपीएच, शेतकरी प्रवर्गातील केशरी शिधापत्रिका धारकांना देखील अन्नधान्य पुरवठा पूर्वरत सुरू करून देण्यात यावा, तसेच नवीन वितरित, संपूर्ण राज्यामध्ये अंत्योदय योजनेतील सातपेक्षा अधिक सदस्य असणाऱ्या साधारण ५०,००० शिधापत्रिका अंत्योदयऐवजी प्राधान्य कुटुंब योजनेत वर्ग करण्यात याव्यात अशाप्रकारे मागण्यासह निवेदन सादर करण्यात आले. तालुका अध्यक्ष गजानन भीमराव राउत , तालुका उपाध्यक्ष सुधाकर शेषराव चौधरी,तालुका सचिव निलेश गजानन पाटील , सामाजिक कार्यकर्त्या वनमला ताई पेंढारकर डोंगरी दादा, शिंदे मंगरूळपीर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक इत्यादींनी उपस्थिती होती .
0 Comments