प्रतिनिधी श्रावणी कामत
आमदार सुनील शेळके यांनी वडगाव शहरात जनसंवाद यात्रेनिमित्त नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या .वडगाव शहरातील विशाल लॉन्स, मोरया कॉलनी, साई श्रुष्टी, पंचमुखी चौक, केशवनगर, मोरया चौक, बाजार पेठ, आंबेडकर कॉलनी, माळीनगर, दिग्विजय कॉलनी, संस्कृती सोसायटी, टेल्को कॉलनी, इंद्रायणीनगर, मिलिंदनगर, कातवी गाव या भागात प्रत्यक्ष भेट देऊन विकासकामांच्या आढाव्यासह इतर प्रश्नांबाबत प्रशासनास सूचना यावेळी देण्यात आल्या.
रस्ते, गटार, विद्युत व पाण्यासह कचऱ्याच्या प्रश्नाबाबत वडगाव नगरपंचायतीस देखील यावेळी सूचना दिल्या. त्याचप्रमाणे वडगाव शहरातील मोकळ्या जागांचे सर्वे करून तेथे विकासात्मक कोणते प्रकल्प राबविता येईल याबाबत अहवाल तयार करण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले .शहरातील वाढती गुन्हेगारी व तरुणांमध्ये वाढणाऱ्या व्यसनांच्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनास सूचना दिल्या असुन नागरिकांनी देखील जागरूक राहण्याबाबत आमदार सुनील शेळके यांनी विनंती केली. यावेळी आमदार सुनील शेळके यांच्या समवेत संवाद साधण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आमदार शेळके देखील प्रत्येक व्यक्तीची तक्रार जाणून घेऊन जागावरच त्याचे निरसन करत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले .
रेशनिंग धान्य, शासकीय योजना, विविध दाखले, रेशनकार्ड या संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना शेळके यांनी चांगलाच धारेवर धरले
यावेळी नगरपंचायतीचे सर्व अधिकारी, शहरातील लोकप्रतिनिधी यांसह स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments