Ticker

6/recent/ticker-posts

श्री धानोरकर आदर्श विद्यालय धानोरा (खुर्द) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी.

 श्री धानोरकर आदर्श विद्यालय
 (खुर्द )येथे 3 जानेवारी 2025 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विद्यालयांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री उचित सर यांनी भूषविले. तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथींचे स्थान विद्यालयाचे शिक्षक श्री पाटील सर व सौ होले मॅडम यांनी स्वीकारले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर
 विद्यालयातील वर्ग पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आपली मनोगते, गीते सादर केली तर 
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री पाटील सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्षीय भाषणामध्ये श्री उचित सर यांनी सावित्रीबाई फुले यांनी किती हाल अपेष्टा सहन करून मुलींना शिकवण्याचे महान कार्य केले व त्यांच्या प्रयत्नामुळेच आज भारतातील स्त्रिया साक्षर झाल्या. अशी माहिती दिली. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन वर्ग 8ची विद्यार्थिनी कु.श्रुती चव्हाण हिने तर आभार कुमारी अमिषा भगत हिने मानले.

Post a Comment

0 Comments