Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा शहराच्या शिक्षण,साहित्य,पत्रकारीता क्षेत्रावर अविरत अधिराज्य करणारे विचारवंत प्रा.डॉ. दिवाकरजी इंगोले काळाच्या पडद्याआड.

        कारंजा (लाड) : कारंजा शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाचे धनी, शिक्षण-साहित्य- पत्रकारीता-सामाजिक क्षेत्रात अविरतपणे अढळ अधिराज्य करणारे ज्येष्ठ विचारवंत, के.एन. कॉलेजचे माजी प्राध्यापक, दैनिक महासागर नागपूर, दैनिक लोकमत आदी वृत्तपत्रामधून निर्भिड पत्रकारीता करीत आपला काळ गाजविणार झुंजार पत्रकार, हाडाचे समाजसेवक प्रा.डॉ. दिवाकररावजी इंगोले यांचे प्रदिर्घ आजाराने शुक्रवार दि.24 जानेवारी 2024 रोजी दुपारी दुःखद निधन झाले असून त्यांचे पश्चात त्यांचे मागे मुलगा डॉ अदैवत,डॉ. मुलगी,एक भाऊ, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार असून आयुष्यभर समाजसेवा करणाऱ्या प्रा.डॉ. दिवाकरजी इंगोले यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचा मृतदेह, वैद्यकीय विद्यार्थ्याच्या अभ्यासाकरीता वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात येत असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यांच्या मृत्युचे वृत्त वाशिम जिल्ह्यात येवून धडकताच सर्वत्र शोककळा पसरली असून त्यांच्या निधना बद्दल शैक्षणिक,साहित्य, पत्रकारीता, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा,महाराष्ट्र राज्य स्तरीय पत्रकार संघटना,ज्ञानगंगा साहित्य मंडळ,साप्ताहिक करंजमहात्म्य परिवार, आई श्री कामाक्षा मित्र मंडळ, महाराणा प्रताप व्यायाम शाळा कारंजाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी त्यांच्या निधनाबद्दल श्रध्दांजली व्यक्त करतांना, त्यांच्या निधनामुळे कारंजा नगरीच्या शैक्षणिक साहित्यीक सामाजिक सांस्कृतिक पत्रकारीता क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली असल्याचे म्हटले आहे. माझे मार्गदर्शक तथा गुरुवर्य हरविल्याचे त्यांनी सांगीतले आहे.

Post a Comment

0 Comments