Ticker

6/recent/ticker-posts

बाहुबलीचे बीड : बीडच्या दहशतीला पवनऊर्जेचे वारे!

राखेच्या वाहतुकीतून ‘पुढारी’ झालेल्यांचा मोर्चा जमीन व्यवहारांकडे...बाहुबलीचे बीड : बीडच्या दहशतीला पवनऊर्जेचे वारे! (प्रातिनिधीक छायाचित्र)

बीड : परळीतील औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून निघणाऱ्या राखेच्या अवैध वाहतुकीतून पैसा, टोळी आणि राजाश्रय मिळवणाऱ्या ‘बाहुबलीं’ना आता पवनऊर्जा प्रकल्पांच्या व्यवहारांचे वारे खुणावू लागले आहेत. जमीन करारांसाठी शेतकऱ्यांवर दबाव आणि खंडणीसाठी कंपन्यांवर प्रभाव पाडणाऱ्या या कथित पुढाऱ्यांनी स्वतंत्र यंत्रणाच उभी केली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या ‘ऊर्जावान’ लुटीचे संदर्भ स्पष्ट होत आहेत.

Post a Comment

0 Comments