Ticker

6/recent/ticker-posts

लोककलावंतानी घेतली शिवसेना वरिष्ठ नेत्या आमदार श्रीमती भावना ताई गवळी यांची सदिच्छा भेट.



    मंगरूळपीर : 
जिल्ह्यातील साहित्य कला क्षेत्रातील अग्रणी असलेल्या,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या पदाधिकार्‍यांनी,जिल्ह्यातील शिवसेनेच्या (शिंदे गट) वरिष्ठ नेत्या,पूर्वाश्रमीच्या पाच टर्मच्या अपराजित खासदार तथा विधान परिषदेच्या लोकप्रिय आमदार श्रीमती भावनाताई साहेब गवळी यांची भेट घेवून त्यांचे सहर्ष स्वागत केले.स्वागत करतांना अध्यक्ष संजय कडोळे,उपाध्यक्ष हभप. लोमेश पाटील चौधरी, सुधाकर इंगोले, महादेवराव पाटील महल्ले इत्यादी अनेक कलावंत उपस्थित होते.यावेळी शिवसेना (शिंदे गटाच्या) महिला जिल्हाध्यक्षा सौ.वैशालीताई येळणे मॅडम ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.याप्रसंगी विलोसचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कारीत समाजसेवक संजय कडोळे यांनी ताईसाहेब यांनी वेळोवेळी लोककलावंताच्या मागण्यांची दखल घेवून मानधन वाढीसाठी स्वतः जातीने महिला जिल्हाध्यक्षा सौ.वैशालीताई येळणे मॅडम यांना मंत्रालयात तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचेकडे पाठवून मुख्यमंत्री कार्यालयातून मागण्याची पूर्तता करून घेतली होती याची ताईसाहेबांना आठवण देवून त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच सध्या वाशिम जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार समिती तथा समाज कल्याण विभागाकडून अद्यापपावेतो निवड झालेल्या कलावंताची यादी प्रसिद्ध झाली नसल्याची तक्रार करून,अनेक कलाकारांचे मानधन त्यांच्या खात्यात जाण्या ऐवजी कलाक्षेत्राशी कोणताही संबंध नसलेल्या इतर व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याची तक्रार केली.त्यामुळे आ.श्रीमती भावनाताई गवळी यांनी लगेच या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हाध्यक्षा सौ.वैशालीताई येळणे यांना समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद वाशिम आणि सांस्कृतिक संचालनालयाशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधण्यास सांगीतले.त्यामुळे तात्काळ दखल घेऊन सौ. वैशालीताई येळणे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधीत संबधित अधिकाऱ्यांना तात्काळ ह्या तांत्रीक अडचणीची शहानिशा करण्यास सांगीतले. याबद्दल विलोसचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी आमदार श्रीमती भावनाताई गवळी आणि सौ.वैशालीताई येळणे यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments