Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने पत्रकार दिन साजरा

श्रमिक पत्रकार संघाचे  सचिव रमेश भाऊ मुंजे यांचा सन्मान
मंगरूळपीर 
मंगरूळपीर येथील पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस स्टेशन येथे ६ डिसेंबर रोजी मराठी पत्रकार दिनानिमित्त तालुक्यातील सर्व पत्रकारांना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर आडे यांनी  पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रमेश मुंजे  तर प्रमुख उपस्थितीत सपोनी मल्लिकार्जुन वाघमोडे, सपोनी. गणेश काळे होते
मंगरूळपीर शहरात मागील दोन वर्षांपासून पोलीस प्रशासनाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात येत असून या दिनानिमित्त मंगरूळपीर पोलीस स्टेशनचे  ठाणेदार सुधाकर आडे यांनी सर्व पत्रकारांना सन्मानित केले आहे.  पोलीस प्रशासन व पत्रकार हे एका नाण्याच्या दोन बाजू असून पत्रकाराच्या असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मत ठाणेदार आडे यांनी व्यक्त केले. तसेच पत्रकाराच्या समस्या जाणून घेत त्याचे निराकरण करण्याचे प्रयत्न करू असे ठामपणे सांगितले 
या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक वीरेंद्र सिंह ठाकूर, वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी, विनोद डेरे,
नारायण आव्हाळे, अशोक राऊत, नाना देवडे, राजेश दबडे, शरद येवले , सुधाकर क्षीरसागर,  रवींद्र खुणे, सुनील भगत, राजकुमार ठाकूर, 
मुक्तार सागर, प्राध्यापक गजनफरहुसेन ,  नितीन गावंडे, राजेश वानखडे, रंजीत भगत, विश्वास कुटे, प्रशांत तायडे, संदीप कांबळे, पद्मा मोहोळ, फुलचंद भगत, अजय भगत, गोपाल माचलकर, दिलीप अवगन यांच्यासह अनेक पोलीस पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पोलीस कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले. व आनंद उत्साहात हा पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments