Ticker

6/recent/ticker-posts

मा जिजाऊंचा आदर्श महिलांनी आचरणात आणणे गरजेचे वनमाला पेंढारकर

स्थानिक शिवाजीनगर मंगरूळनाथ येथे प्रगती समुपदेशन केंद्राच्या कार्यालयात मा जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष वनमला पेंढारकर यांनी यावेळी मासाहेब जिजाऊ यांचा आचरणात आणणे आपल्या मुलांवर संस्कार करणे अत्यंत गरजेचे आहे. लहानपणापासूनच मुला व मुलींना मा जिजाऊंनी केलेले महान कार्य याची वारंवार आठवण करून देत राहिल्याने त्यांच्या कार्यावर जास्तीत जास्त भर पडेल व मा जिजाऊंनी  केलेल्या महान कार्याची आठवण ठेवून आपल्या कार्याला गती देतील जेणेकरून आजच्या युगामध्ये होत असलेल्या अत्यंत वाईट विचारला आळा बसून  चांगले कार्य करण्याची संधी मिळेल प्रगती समुपदेशन केंद्रामध्ये येत असलेल्या कौटुंबिक वादाच्या तक्रारी त्यांचे सोबत चर्चा करून केल्या जाते यावेळी आलेला अनुभव म्हणजे घेतलेला आरोप सत्य नसतो छोटा आरोप  असतो  यावेळी तिनं आरोपाचा तिच्याच बोलण्यामध्ये सिद्ध सिद्ध करता येते यावेळी वाढवून तिला कायद्याची जाणीव करून दिल्यास खऱ्या अर्थाने तिची चूक तिच्या लक्षात येते यावेळी मा जिजाऊ चा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन संस्था अध्यक्ष  वनमाला पेंढारकर राज्यस्तरीय अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त यांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष वनमला ताई पेंढारकर प्रमुख अतिथी कामाक्षी ताई  सोने दक्षता समिती सदस्य तथा समर्थ माऊली संस्था कारंजा मला ताई चव्हाण  सीमा यादव नारी रत्न पुरस्कार शुभांगी  पेंढारकर गोरोबाकाका संस्था सुनिता पाटील अनेकर मजदूर संघटना सीमा पेंढारकर जिज्ञासा बचत गट सचिव यमुनाबाई बिलखेडे अपंग शाखा अध्यक्ष दक्षता समिती सदस्य विशाखा देशमुख दक्षता समिती सदस्य सोनल पेंढारकर सचिव शिवरत्न महिला मंडळ प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभली यावेळी उपस्थित मान्यवरांनी मा जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण केले कार्यक्रमाचे संचालन सीमा पेंढारकर तर आभार ताई मनवर यांनी मानले कार्यक्रमाला बचत गट महिलांची बऱ्याच प्रमाणात उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे आयोजन संत गोरोबाकाका संस्था शिवरत्न महिला मंडळ जिज्ञासा बचत गटाच्या वतीने करण्यात आला बचत गट महिलांची बहुसंख्येने उपस्थित लाभली

Post a Comment

0 Comments