शेलुबाजार : उद्या दिनांक ४ जानेवारी रोजी लोकनेते स्व. भीमराव पाटील सूर्वे यांच्या स्मृती प्रित्यर्थ खासदार वैद्यकीय कक्ष वाशिम जिल्हाद्वारे आयोजित भव्य नेत्ररोग तपासणी, औषध वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्व. भिमराव पाटील सुर्वे यांचे नाव गोरगरीब जनेतेचे नेते, सेवक मनून सूप्रसिद्ध होते, संपूर्ण जिवन त्यांचे सेवेला अर्पित होते त्याच उद्देशाने त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ या शिबिराचे आयोजन केले आहे, या शिबिराचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त मित्र मंडळ व गावकरी मंडळी वनोजा तसेच सामाजिक कार्यकर्ते अर्जुन भीमराव सुर्वे व खासदार वैद्यकीय कक्ष प्रमुख शिवा सावके यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या शिबिराला नेत्ररोग तज्ञ म्हणून डॉ. अश्विनी गव्हाणे मॅडमसह त्यांची सर्व टीम उपस्थित राहणार आहे, तपासणी नंतर ज्या रुग्णाला मोतीबिंदू चा त्रास असेल अशा सर्व रुग्णांना मोफत प्रवासासह, जेवण राहणे व सर्व प्रकारचा तपासण्या मोफत करून त्यांची शस्त्रक्रिया अतिशय चांगल्या दर्जाची होणार आहे, जे रुग्ण आर्थिक अडचणीमुळे उपचार करू शकत नाही त्यांच्याकरीता ही सुवर्ण संधी आहे.
0 Comments