मोर्चाचे नेतृत्व व प्रमुख मार्गदर्शन उपस्थिती कु. वैशाली संतोष देशमुख, आमदार सुरेश धस, मनोज जरांगे पाटील.
अकोला, दि. 18.
मस्साजोग येथील सरपंच संतोषभैया देशमुख यांची अमानुष हत्या तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवार दि. २० जानेवारी २५ रोजी राज राजेश्वर अकोला नगरीत सर्वधर्मीय व सर्वपक्षीय राजकीय व सामाजिक संघटनांतर्फे जन आक्रोश मोचार्चे आयोजन तर्फे करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकरणात दोषी असणाऱ्या कुणाचीही गय न करता संबंधित दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी. दोन्ही गुन्ह्यातील मारेकऱ्यांना, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या दोघांच्याही कुटुंबाला न्याय देऊन महाराष्ट्लां जे बिहार बनवण्याचे प्रयत्न करीत आहे अशा प्रवृत्तीच्या लोकांना सजा देऊन फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणी करिता सदर मोचार्चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व व प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन कु. वैभवी संतोष देशमुख, आमदार सुरेशअण्णा धस, मराठायोद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे करणार आहेत या मोर्चात अकोला जिल्ह्यातील सर्वपक्षीय व सर्वधर्मीय जनतेचा सहभाग असणारा आहे.जन आक्रोश मोर्चा २० जानेवारी 2025 ला दुपारोजी दुपारी २ वाजता स्थानिक अशोक वाटिका परिसरातून निघून सामान्य रुग्णालय नियोजित मार्गांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल. व त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करणार आहेत. काळे झेंडे दाखवून या अमानुष घटनेचा जाहीर निषेध केला जाणार आहे. अतिशय शांततापूर्ण वातावरणात निघणाऱ्या या मोर्चात समाजातील सर्व जाती-धर्माच्या पक्षाच्या विविध सामाजिक संघटनेच्या बंधू भगिनींनी, युवक युवतींनी महिलांनी मोठ्या संख्येत सहभागी होऊन आपला निषेध व्यक्त करावा. व एक दिवस न्यायासाठी ! मानवतेच्या हितासाठी!! देण्यात यावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.सदर जन आक्रोश मोर्चाची पूर्व तयारी करिता विविध राजकीय व धार्मिक, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सभा जिल्हा तालुका व शहरांमध्ये घेण्यात आले आहेत. तसेच सर्व पक्षाचे आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष यांना पत्र देऊन या मोर्चात सहभागी होण्याविषयी विनंती करण्यात आली आहे. तसेच विविध सभेच्या माध्यमातून नागरिकांना स्वयंस्पृतिने या जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सर्वधर्मीय व सर्वपक्षीय सर्वधार्मिक, सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना तसेच जागरूक नागरिकांना करण्यात आले आहे. या यावेळी या पत्रकार परिषदेला राजश्री देशमुख, प्रशांत जानोरकर, राजेश देशमुख, गजानन हरणे, संजेय वानखडे, शौकत आली शौकत, पंकज साबळे, अक्षय राऊत, विनायक पवार, संजय सूर्यवंशी, नंदकिशोर गावंडे, संजय देशमुख, सर्व धर्मीय सर्वपक्षीय व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
आपला स्नेही.......
संयोजक ,
सर्वधर्मीय सर्वपक्षीय व धार्मिक सामाजिक संघटना जन आक्रोश मोर्चा अकोला जिल्हा.
0 Comments