Ticker

6/recent/ticker-posts

राजकारण्यांनी शाळा ,मंदिर यांच्याकडे लक्ष देणे काळाची गरज ,ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरिकर


मंगरूळपीर 
माय बापाच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हीच खरी ईश्वर पूजा आहे.युवकांनी, व्यसन, दंगली, मोर्चे यांच्यापासून दूर रहा अंगातील ताकद जपून वापरा, खिशातील पैसा व आयुष्यातील वेळ जपून वापरा, आई वडिलांचा सन्मान करने ही खरी संस्कृती आहे युवकांनी व्यसना पासुन दुर राहावे असेही आवाहन येथील भाजपा चे माजी जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ लुंगे यांनी मातृ-पितृ कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन  गुरुवारी शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
           आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित आमदार श्याम भाऊ खोडे होते तर
आमदार बाबुसिहजी महाराज,डॉ उपेंद्रजी कोठेकर,आमदार सईताई डहाके, उच्च न्यायालयाचे सरकारी विधीज्ञ अँड नितीन तेलगोटे हे होते. तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये.
माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे,
माजी आमदार ,पुरुषोत्तम राजगुरू
नरेंद्रजी गोलेछा, पुरुषोत्तम चितलांगे, विवेक माने, राजू पाटील राजे ,सुधाकरराव आडे परळकर ,शिव शंकर भोयर ,नारायणराव सानप, अशोक परळीकर, महादेवराव ठाकरे ,अशोक भाऊ हेडा, माजी नगराध्यक्ष वीरेंद्रसिंह ठाकूर, वीरेंद्र रघुवंशी, जगदीशजी काबरा,अनिल पाटील राऊत, देविदासजी राऊत, वसंतराव सुर्वे, दामोदर लुंगे,नरेश लुंगे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
सायंकाळी ५वाजता इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तन सुरु झाले. पुढे  
या कीर्तनात ते म्हणाले की, 'जगात देव आहेच मात्र तो संतांशिवाय समजत नाही. मात्र आजकालच्या व्यक्तींना संत म्हणता येत नाही. महिला मंडळी व पुरुष मंडळी उपास तापास करणारे. भाकरी ऐवजी सफरचंद खातो आणि लग्न करण्याऐवजी  मोकार लफडे करत फिरतो टिकटॉक बघतो तो संत नसून भामटा आहे. सध्याच्या काळात आईवडील हेच देव आहेत. त्यांच्या संस्कारांमुळे चांगले दिवस आलेत हे मुलांनी विसरता कामा नये. ज्याच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान असते आणि ज्याची धर्मावर निष्ठा असते ती व्यक्ती कायम सुखी असते. वारकरी संप्रदायाबद्दल बोलताना ते म्हणाले की, 'वारकरी आहेत म्हणून जग सुरु आहे. आज जगात चुकीची कामे करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे पण, अशा वातावरणातही संतवचने, भागवतकथा, रामायणकथा सारख्या विचारांवर जग टिकून आहे. या काळात संवाद कमी होत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. याबाबत ते म्हणाले की, मोबाईल मुळे टिकटॉक, पब-जी च्या आहारी मुले, मुली गेले आहे . या कारणामुळे पालक वर्गात खूप मोठी चिंता निर्माण झाली आहे. सुसंस्कार नसलेला नवा समाज जन्मत आहे. ज्ञान हा साऱ्या विद्यांचा पाया असून त्याची आराधना करण्याची गरज आहे. गावं पुढाऱ्यांनी गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळांना मंदिरा सारखे बनविने काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले, आज जेवढेही पुढारी व मोठे झालेले लोक जिल्हा परिषद च्या शाळेतूनच गेले आहे. यावेळी जिल्हा परिषद हायस्कूल चें मैदान महिला,युवती,युवक व हजारोंच्या संख्येने आलेल्या नागरिकांनी खच्चून  भरलेले होते पाय ठेवण्यासाठी जागा उरली नव्हती.सुरेश भाऊ लुंगे यांच्या कार्याची भरभरून प्रशंसा करून त्यांचे आई वडीलां प्रती असलेली निष्ठा यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आयोजक तथा मातृ-पितृ कृतज्ञता सोहळा समितीचे अध्यक्ष, भाजपा चे माजी जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ लुंगे यांनी केले आहे. 
इंदुरीकर महाराजांचे कीर्तन हे काळाची गरज असे जनसामान्यात बोलले जात आहे. शेकडो नागरिकांनी याप्रसंगी आपले मत व्यक्त केले
वाशिम जिल्ह्यातून व मंगरूळपीर तालुक्यातून अनेक गावातूनच , शहरातून सुद्धा कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी जनसागर उसळला होता.  उपस्थित मान्यवरांचे तथा नागरिकांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments