Ticker

6/recent/ticker-posts

रेल्वे टिकीट तपासणीसाचा प्रामाणिकपणा


 भुसावळ येथील श्रीमती प.क. कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य व ललवानी फाउंडेशन चे अध्यक्ष प्रा. डॉ.दिलीपकुमार ललवाणी हे ठाण्याहून रात्री भुसावळला 12141 पाटलीपुत्र एक्सप्रेसने   B1 या बोगीतील 68 नंबरच्या शिटवर प्रवास करीत होते .भुसावळला आल्यानंतर ते खाली उतरून घरी परतले. अनावधानाने  जवळपास सात हजार रुपये असलेले  तसेच पॅन कार्ड ,आधार कार्ड, बँकेचे एटीएम व काही महत्त्वाची कागदपत्रे असलेले पाकीट ते त्याच शिटवर विसरले. घरी परतल्या नंतरही हि बाब त्यांच्या  लक्षात आली नाही. मात्र भुसावळ येथील टी टी आय श्री. सुजित कुमार हे प्रवासी तपासणी करत असताना ते पाकीट त्यांच्या नजरेस पडले .त्या पाकिटात त्यांनी बोगीतील  उपस्थित प्रवासीसमक्ष सर्व रक्कम मोजुन व सर्व कागदपत्रे यांची  नोंद केली . लगेच सुजीतकुमार यांनी प्रा.ललवाणी यांचेशी मोबाईल वरुन संपर्क साधुन त्यांना या बाबत कल्पना दिली व खातरजमा करुन घेवुन कार्यालयाला सुध्दा रिपोर्टिंग केली.   त्यांनी भुसावळला हेड टीसी ऑफिस इथे  ललवाणी यांना बोलवून हेड टी सी ऑफिस इनचार्ज श्री. रत्नेश तिवारी व सहकारी टीटीआय के बी राठवा यांच्या समक्ष ते पाकीट त्यांना सुपूर्द केले. आजच्या या स्वार्थी जगामध्ये सुद्धा काही प्रामाणिक व इमाने इतबारे सेवा करणारे अधिकारी आहेत असे नमूद करून प्राध्यापक ललवाणी यांनी सुजित कुमार यांचे आभार व्यक्त केले.

 त्यांना बक्षीस म्हणून काही रक्कम देऊ केली असता त्यांनी ती स्वीकारली नाही व हे आमचे कर्तव्यच आहे असे प्रतिपादन केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत असून अशा अधिकाऱ्यांची आज गरज असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments