दिनांक ०९.०१.२०२५ रोजी भावेष बाहेती यांनी त्यांचे बाहेती मार्केट मध्ये काम करणारे विश्वासातील विठ्ठल हजारे यांना HDFC बँक वाशिम येथील चेक देवुन १ कोटी बँक मधुन व १५ लाख रुपये मित्राकडुन आणण्यास सांगीतले. त्याप्रमाणे विठठल हजारे आणि ज्ञानेश्वर बैस हे १ कोटी १५ लाख रुपये घेवुन स्कुटीने बाहेती मार्केट हिंगोली रोड येथे घेवुन जात असता उड्डान पुलावर मागुन अज्ञात दोन इसम मोटार सायकलवर येवुन विठ्ठल हजारे व ज्ञानेश्वर बायस यांना रॉड व हत्याराने मारहान करुन विठ्ठल हजारेकडील १ कोटी १५ लाख रुपये असलेली बॅग हिसकावुन मोटार सायकलने पळुन गेले अशा १७.४६ वाजताचे घटनेबाबत विठ्ठल हजारेच्या फिर्यादवरुन पोलीस स्टेशन वाशिम शहर अप.नं.६३/२५ क.३०९ (६) ३ (५) भान्यासं. गुन्हा दाखल झाला.
घटनेची माहिती मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे यांना मिळताच मा. पोलीस अधीक्षक, मा.अपर पोलीस अधीक्षक मॅडम, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी, वाशिम, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा असे सर्व अधिकारी सर्व स्टाफसह तात्काळ घटनास्थळ गाठुन व देवळे हॉस्पीटल वाशिम येथे उपचार घेत असलेले विठ्ठल हजारे व ज्ञानेश्वर बायस यांचेकडुन गुन्हयाची माहिती घेवुन दि.०९.०१.२०२५ रोजी चे १७.५५ वाजता दरम्याण विनाविलंब तपासाकरीता वेगवेगळ्या टिम तयार करुन सर्व प्रथम वाशिम शहरातील घटनेच्या मार्गावरील सर्व cctv फुटेज मिळवुन आरोपींची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तात्काळ जिल्हा अकोला, यवतमाळ, अमरावती ग्रामीण येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाशिम येथे बोलावुन घेतले. वाशिम जिल्हा पोलीस आणि अकोला, यवतमाळ, अमरावती ग्रामीण येथील स्थानिक गुन्हे शाखा असे अनेक पथक तयार करून गुन्हयाचा तपास सुरू करण्यात आला. मिळालेल्या माहिती व cctv फुटेज वरुन रात्रभर सर्व अधिकारी व अंमलदार न थकता अथक परीश्रम घेत होते.
त्यानंतर गुन्हयातील आरोपींचे शोध कामी घटनाक्रम लावुन तांत्रीक तपासावर भर देवुन तपासातील टिम वेगवेगळया ठिकाणी रवाना करुन जिल्हयाचे आजुबाजुचे सर्व लहान-मोठी शहरातील हॉटेल, लॉजेस, बार व संशयीत ठिकाणे चेक करण्यात आली. जेथे मिळतील त्या त्या सर्व ठिकाणचे cctv फुटेज घेण्याचे काम सतत चालुच होते. १४.४० वा. चे दरम्याण cctv फुटेज घेत असता घटना घडल्यापासुन ते आतापर्यंतच्या तपासातील मिळालेल्या माहिती वरुन cctv फुटेज मध्ये दिसणारे दोन ईसम हेच गुन्हयातील आरोपी असल्याची खात्री वाटल्याने व त्यातील एक व्यक्ती हा विजय गोटे हा असुन तोंडगाव येथील असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने तपासाची चक्रे फिरवुन त्यास विनाविलंब ताब्यात घेतले. त्याचे कडे सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली व ईतर आरोपींची नावे दिल्याने गुन्हा उघडकीस आणला. गुन्हयातील दुसरा आरोपी संजय गोटे रा तोंडगांव यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचे ताब्यातुन गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल १ कोटी ०२ लाख रुपये जप्त करण्यात आले.
50 सदर गुन्हयाचा तपास मा. श्री रामनाथ पोकळे, विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र अमरावती, मा. श्री अनुज तारे, पोलीस अधिक्षक वाशिम, मा. श्रीमती लता फड, अपर पोलीस अधिक्षक, वाशिम, मा. सहायक पोलीस अधिक्षक श्री नवदीप अग्रवाल यांचे मार्गदर्शनात पोनि स्थागुशा श्री रामकृष्ण महल्ले, पोनि प्रदिप परदेसी, पोनि देवेंद्रसिंह ठाकुर, सपोनि बाळासाहेब नाईक, भारत लसंते, जितेंद्र आडोळे, योगेश धोत्रे, संतोष अघाव, गणेश हिवरकर, शिवसाम घेवारे हिंगोली, विजय चव्हाण अकोला, सचिन पवार अमरावती, पोउपनि शरद लोहकरे यवतमाळ, राहुल चौधरी, निलेश जाधव, देविदास झुंगे, शेखर मस्कर, रविंद्र ताले व अंमलदार यांनी केला. पोलीसांनी रात्रंदिवस न थांबता अथक परिश्रम घेवुन केलेल्या तांत्रीक तपासामुळेच गुन्हा उघडकीस
0 Comments