मंगरूळपिर :- स्थानिक श्री. वसंतराव नाईक कला व श्री.अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालय मंगरुळपीर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अ. राठोड साहेब व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.वाडगुले यांच्या मार्गदर्शना खाली रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन दि. 26/12/2024 रोजी दत्तक ग्राम चेहेल येथे संपन्न झाले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एम.वडगुले आणि उद्घाटक म्हणून डॉ.एस.एस.इंगळे क्षेत्रीय समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना यांच्या हस्ते रा.से.यो.विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.पी.आर.तायडे यांनी केले. त्यानंतर प्रा.डॉ.एस. ए.राठोड मराठी विभाग प्रमुख व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्रा.पी.एन.जाधव यांनी राष्ट्रीय सेवा योजना याबद्दल विशेष माहिती स्वयंसेवकांना दिली. त्यानंतर रासेयो क्षेत्रीय समन्वयक डॉ.एस.एस.इंगळे यांनी राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास करण्याचे माध्यम आहे.त्यामुळे सर्व स्वयंसेवकांनी सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे.असे मार्गदर्शन केले.अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालय प्राचार्य डॉ.एस. एम.वडगुले यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना या सात दिवशीय विशेष शिबिराच्या माध्यमातून सहजीवन लाभते व हे सहजीवन जीवन जगण्याची कला शिकविते.व जीवनामध्ये त्याचा उपयोग होतो.असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.दत्तात्रय चौधरी अध्यक्ष गणपती संस्थान चेहेल, विनोद भाऊ चौधरी अध्यक्ष तंटामुक्ती समिती, सुनील भाऊ चौधरी पोलीस पाटील चेहेल, विनोद भाऊ राठोड प्रतिष्ठित नागरिक या प्रमुख अतिथीची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.कॉम. भाग :- एक ची विद्यार्थिनी कु.श्रद्धां गंजे हिने केले.तर आभार प्रदर्शन बी.ए. भाग एक ची विद्यार्थिनी कु. सपना राऊत हीने केले.
कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून प्रा.डी.बी.जाधव, डॉ. व्हि.डि.कोवे, डॉ. सुनील ढाकुलकर शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख, डॉ.एल.एस.हूरणे वाणिज्य विभाग प्रमुख, प्रा. विश्वनाथ हिस्सल,प्रा.निलेश अवाझाडे व गावकरी मंडळी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या व स्वयंसेवक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या
कार्यक्रमाला विशेष प्रयत्न प्रा. डॉ.पी.आर.तायडे रासेयो कार्यक्रम अधिकारी व प्रा.एस.एन.टापरे राष्ट्रीय सेवा कार्यक्रम अधिकारी+२ स्तर,यांच्या विशेष प्रयत्नाने कार्यक्रम संपन्न झाला.
0 Comments