Ticker

6/recent/ticker-posts

स्पोर्ट गर्ल मयुरीच्या दु:खद निधनामुळे कारंजेकरांमध्ये शोककळा

वाशिम - कारंजा येथील साप्ताहिक कारंजा अस्मिता वृत्तपत्राचे संपादक तथा न्युज चॅनलचे पत्रकार महेंद्र गुप्ता यांची मुलगी कु. मयुरी हिचे २३ डिसेंबरला नागपूर येथे ह्दयविकाराच्या आघाताने दु:खद निधन झाले. मृत्युसमयी तीचे वय २१ वर्षे होते. जीवनाप्रती अत्यंत आशावादी आणि खेळांमध्ये रुची असणारी स्व. मयुरी ही अत्यंत बोलकी आणि हिंमतवान होती. तसेच ती स्वत: एक उत्कृष्ट खेळाडू होती. तसेच ती इतर मुलामुलींना सुध्दा ज्युडोकराटे आणि इतर खेळांचे प्रशिक्षण देत होती. घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतांना सुद्धा पिता महेंद्र गुप्ता यांनी आपल्या मुलीला उच्च शिक्षण देण्यासह विविध खेळात सहभाग घेण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही. ते तिला प्रोत्साहन देवून तीची उमेद वाढवित होते. काही दिवसाआधी ती साधारण आजाराने ग्रस्त असल्यामुळे तीच्यावर उपचार सुरु होते. मात्र अखेर तीने जगाचा निरोप घेतला. अत्यंत कमी वयात मुलीच्या अशा अकाली मृत्यमुळे आई वडील व गुप्ता परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या टीमच्या वतीने भावपूर्वक श्रद्धांजली

Post a Comment

0 Comments