Ticker

6/recent/ticker-posts

भागवत सप्ताहच्या निमित्ताने पंचमुखी रुद्राक्षचे वितरण - इंजिनीयर नारायणजी बारड


शेलूबाजार वार्ता :⁠- येथून जवळच असलेले येडशी कुंड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून अवलिया संस्थान येथे श्रीमद् भागवत सप्ताह च्या कार्यक्रमात पंचमुखी रुद्राक्ष उपस्थित भाविकांना हरिभक्त कन्हैया महाराज यांच्या सह गावातील समस्त भाविक यांच्या उपस्थित महाराजांच्या हस्ते पूजा अर्चना करून भाविकांना वितरण करण्यात आले पंचमुखी रुद्राक्षाचे महत्व महाराजांनी पटवून दिले व आपल्या दैनंदिन घरामध्ये पूजा अर्चना करून त्याचे अधिक महत्त्व असणे आवश्यक असून आपल्या कार्यामध्ये रुद्राक्षेचे असणे एक शक्तिपीठ चे महत्व आहे तसेच अन्य कामात सुद्धा रुद्राक्ष आपले परिवाराचे हितार्थ भविष्य घडविण्याचे प्रसंगी मोठे रुद्राक्षाचे योगदान आहे असे अन्य विषयावर रुद्राक्ष बद्दल पूजा अर्चना चे महत्व अधिक असते. 
गावातील प्रतिष्ठित व तसेच गावाचे प्रतीक असलेले इंजिनियर व खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष श्री नारायणजी बारड साहेब तसेच बालचंद बारड. दिलीप बारड.गजानन बारड. प्रवीण बारड. राजेश बारड. व प्रमुख अशोक अग्रवाल यांच्या संकल्पनेतून मनात विचार आले चालू असलेले भागवत सप्ताहामध्ये सर्वांना पंचमुखी रुद्राक्षचे वितरण करून धार्मिकतेच्या संकल्पनेतून सर्वांना मोफत रुद्राक्ष देऊन आपले कर्तव्य साकार करू तो आनंद पाहायला मिळाला व अशा इच्छेतून त्यांनी सर्वांना रुद्राक्ष वितरण केले व तसेच या उत्साहात त्यांनी आनंद व्यक्त केले. 
 
भागवताच्या उत्साहात सर्वांना रुद्राक्ष देण्याचे संकल्प स्व. ओमप्रकाशजी अग्रवाल महाराज यांचे सुपुत्र श्री  अशोक अग्रवाल यांनी सर्वांना रुद्राक्षाचे वितरण करून मनस्वी इच्छा साकार केली.

त्याबद्दल समस्त गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत व आदर सत्कार करण्यात आले व शांततेत या उत्सवामध्ये सहभाग दर्शविले व गाव गावामध्ये रुद्राक्षमय वातावरण प्रसन्न झाले व या रुद्राक्षाचे वितरण होऊन सर्वांनी उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.सर्वांनी सहकार्य केले. बातमी संकलन श्याम अपूर्वा शेलुबाजार.

Post a Comment

0 Comments