Ticker

6/recent/ticker-posts

‘चलो मेळघाट’ मोहीमेतुन हजारो आदिवासी बांधवांना मिळाली नवसंजीवनी


हिंदवी परिवार, शिवछत्रपती बहूउद्देशिय तरुण मित्रमंडळ, आपत्ती व्यवस्थापन पथक व पतंजली परिवाराचा पुढाकार

वाशिम - सामाजीक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या हिंदवी परिवार, शिवछत्रपती बहूउद्देशिय तरुण मित्रमंडळ, आपत्ती व्यवस्थापन पथक व पतंजली परिवाराच्या पुढाकारातून सरत्या वर्षातील मावळत्या सुर्याला साक्षी ठेवून मेळघाटातील चुनखडी, नवलगाव, खडीमहल व माडीझडप या चार गावात २०, २१ व २२ डिसेंबर असे सलग तीन दिवस ‘चलो मेळघाट’ मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेव्दारे हजारो आदिवासी बांधवांना कपडे व शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच आरोग्य शिबीर, नेत्रतपासणी शिबीर, योग शिबीर व आपत्ती व्यवस्थापन शिबीर घेण्यात आले. गरजुंना मोफत चष्मे व औषधींचे वाटप करण्यात आले. शिबीराच्या माध्यमातून आदिवासींना नवसंजीवनी मिळाली.

सामाजीक संघटनांच्या संयुक्त आयोजनातून या मोहीमेसाठी वर्षभरापासूनच तयारी सुरु करण्यात आली होती. सोशल माध्यम व व्यक्तीश केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत वाशिम, मालेगाव, कारंजा, रिसोड, शिरपूर, मंगरुळपीर, अनसिंग इत्यादी ठिकाणावरुन दानशुरांकडून भेट दिलेले नवेजुने कपडे, किराणा साहित्य, औषधी जमा करण्यात आले. त्यानंतर २०  ते २२ असे सलग तीन दिवस मेळघाटातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या व रस्ते, विज, पाण्याची सुविधा नसलेल्या चुनखडी, नवलगाव, खडीमहल व माडीझडप या गावांमध्ये शिस्तबद्ध रितीने कपडे व साहित्याचे वाटप करण्यात आले. मेळघाटमधील या गावांमध्ये सर्वत्र निबिड जंगल असून त्यात अस्वल, कोल्हे, रानडुकरे अशी श्वापदांचा मुक्त संचार असून ७३ वाघांचे येथे अनभिषिक्त राज्य आहे. कार्यक्रमादरम्यान आदिवासींनी आपल्या बोलीभाषेत अप्रतीम नृत्य करुन उपस्थितांना खिळवून ठेवले. या मोहीमेदरम्यान चिखलदराचे तहसिलदार जीवन मोरणकर, राजकुमार पटेल, तलाठी तंडील. चुनखडीचे पोलीस पाटील नंदराम भुषम यांनी मोलाचे सहकार्य केले. या मोहीमेमध्ये लहानमोठी एकूण १४ वाहने व ८५ महिला व पुरुष स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. मोहीमेअंतर्गत सर्वांना साहित्याचे वितरण करण्यात आले. यामध्ये दप्तर, चपला, बुट, पुस्तके, वह्या, कंगवे, कपडे, साड्या, चादरी, ब्लँकेट, स्वेटर, लहान व तरुण मुलांचे ड्रेस, पंजाबी ड्रेस आदींचा समावेश होता. दरम्यान मोहीमेमध्ये योगशिक्षक डॉ. भगवंतराव वानखेडे, शंकर उजळे यांनी योगशिबीर घेतले. सुनिल कल्ले, अनिल वाघ, अजय भोयर, सागर इंगोले यांनी आदिवासींना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले. आरोग्य शिबीरामध्ये हिंदवी परिवाराचे सरनौबत डॉ. संभाजी पाटील भोसले पंढरपुर, डॉ. अश्विन काटेकर, डॉ. दिलीप नरवाडे, डॉ. गायत्री वाघमारे यांनी आदिवासी बांधवांची तपासणी करुन त्यांना औषधीगोळ्यांचे वाटप केले. दरम्यान आदिवासी बांधवांनी त्यांच्या खास शैलीत सांस्कृतीक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संदीप मुसळे व गोपाल धनुडे यांनी छायाचित्रणाचे कार्य केले.
या मोहीमेत शिरपूरवरुन राजेश खंदारकर, राम काटेकर, रामेश्वर लहाने, अकोल्यावरुन सारंग करे, पुष्पा वानखडे, रुख्मीणी पुरी, संतोष शर्मा, ज्योती टापरे, दुर्गा जोशी, सुरेश भुसारी, संजय घोडकी, विनोद वडनेरकर, अक्षय वाघ, वैभव वाघमारे, किरण सटवाले, अथर्व वानखडे, राजेश्वर संत, घनशाम जोशी, राजेश श्रीनाथ नाशिक, मधुकर चहाकार मुर्तीजापूर, राजकुमार पटेल अमरावती यांच्यासह वाशिम जिल्ह्यातून अनिल सोमाणी, विलास ठाकरे, किसनराव धोटे, पांडूरंग बेंद्रे, सुखदेव राजगुरु, तेजराव देशमुख, बाळासाहेब मंत्री, राहुल महाजन, अंकित व्यवहारे, सचिन व्यवहारे, राहुल व्यवहारे, गोविंद व्यवहारे, जिविका व्यवहारे, सार्थक व्यवहारे, संदीप मुसळे, प्रकाश कव्हर, देविदास धामणे, शशिकांत गिरी, दिपक एकाडे, शुभांगी ठाकरे, नितीन ठाकरे, गायत्री वाघमारे, राजेश वाघमारे, संजय हेंबाडे, गजानन ठाकरे, दिगांबर बरबडे, आदेश कहाते, ओमकुमार गावंडे, राजु सहातोंडे, अनिल वाघ, भारत ढोबळे, अतिश शिंदे, सागर इंगोले, खुशाल खडसे, गोपाल धनुडे, दिनेश भोयर, पुरुषोत्तम गायकवाड, भागवत चौधरी, बबनराव इंगळे, अजय भोयर, प्रतिभा इंगळे, सुरेखा मोरे, श्रीमती सरनाईक, पंकज देशमुख, सारंग देशमुख, मनिष गढीया, शाम मगर आदी स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. या मोहीमेच्या नियोजनासाठी हिंदवी परिवाराचे जिल्हाप्रमुख व शिवछत्रपती बहूउद्देशिय तरुण मित्रमंळाचे अध्यक्ष दिलीप मेसरे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments