Ticker

6/recent/ticker-posts

बंजारा ज्ञानपीठ, लोधीवली, मुंबई येथे राष्ट्रीय बंजारा परिषदेचे होणार अधिवेशन


मंगरुळपीर...                                   .           राष्ट्रीय बंजारा परिषदेचे दोन दिवशीय अधिवेशन दि. ४ व ५ जानेवारी, २०२५ ला बंजारा ज्ञानपीठ, लोधीवली, मुंबई येथे  धर्मनेता किसनभाऊ राठोड  यांच्या मार्गदर्शनात  धर्मगुरू जितेंद्र महाराज  यांच्या प्रमुख उपस्थितीत, माननीय प्रा. विलासभाऊ राठोड  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष  मा. भिकन जाधव साहेब  प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय बंजारा परिषद हे असणार आहे. तरी महाराष्ट्रातील व अन्य राज्यातील राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सन्माननीय पदाधिकारी यांनी आवर्जून या अधिवेशनाला उपस्थित राहायचे आहे. दि.१५ डिसेंबर,२४ ला गोर बंजारा धर्मपीठ, भक्तीधाम, पोहरागड येथे निवड केलेले पदाधिकारी यांचा सत्कार व नव्या पदाधिकाऱ्यांची निवड, बंजारा ज्ञानपीठ, लोधीवली मुंबई येथे होणार आहे. या अधिवेशनात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या ध्येय धोरणा विषयी विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.                                                                                                                          संतोषभाऊ चव्हाण फौजी, राज्य प्रसिद्ध प्रमुख, राष्ट्रीय बंजारा परिषद

Post a Comment

0 Comments