मंगरूळपीर -
श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोळा द्वारा संचालित स्थानिक यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयातील सत्र 2023- 24 मधील विद्यार्थ्यांची नुकतीच गुणवत्ता यादी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांनी घोषित केली आहे. यामध्ये एम. ए. गृहअर्थशास्त्र विषयाची विद्यार्थिनी कु. प्रियंका साधू ठाकरे ही मेरिट लिस्ट मध्ये सेकंड मेरिट आलेली आहे.
कु. प्रियंका ठाकरे यांच्या यशस्वीते करिता पूर्व राज्यमंत्री आणि संस्थाध्यक्ष माननीय सुभाषरावजी ठाकरे साहेब ,जि. प. अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा ठाकरे ,प्राचार्य डॉ. एस. एच. कान्हेरकर यांनी सत्कार केला आहे. प्रियंका ठाकरे यांनी आपल्या यशाचे श्रेय गृहअर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. सौ .सुषमा सुरेश जाजू आणि प्रा. दिव्या गावंडे यांना दिले. प्रा. डॉ. वाघोळे, प्रा.डॉ. इंगळे, प्रा. डॉ.शिंदे ,प्रा. डॉ.पवार ,प्रा. डॉ. भगत, प्रा. डॉ. रासेकर ,प्रा. डॉ. देवके, प्रा. डॉ.ताकतोडे, प्रा.पडवाल ,प्रा.डॉ. खान मॅडम, प्रा. डॉ. खंडारे, प्रा. डॉ. रमिज, श्री. दिलीपराव ठाकरे , श्री.विलास भाऊ गावंडे ,श्री चंद्रकांत इंगळे, श्री गावंडे, श्री संतोष भाऊ ठोकळ तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी अभिनंदन केले.
प्राचार्य
डॉ.एस. एच. कान्हेरकर
य.च.कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरूळपीर, जि.-वाशिम
0 Comments