Ticker

6/recent/ticker-posts

2024 : मार्गशीर्ष शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्यामुळे उद्यापण करावी की नाही? हळदीकुंकू करण्याबद्दल महिलांमध्ये संभ्रम



आपल्या कुटुंबासाठी संपत्ती, संतती आणि सन्मती मिळावी यासाठी महिला मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करण्यात येत असते. 5 डिसेंबरला सुरु झालेले मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी करण्यात येतं. यंदा मार्गशीर्ष गुरुवारचं शेवटचं व्रत हे 26 डिसेंबरला असणार आहे. यादिवशी महिला मार्गशीर्ष गुरुवार व्रताच उद्यापन करुन हळदीकुंकू करतात. पण  26 डिसेंबरला या वर्षातील 2024 मधील शेवटची एकादशीचं व्रत आलंय. एकादशीचं व्रत हे दुसऱ्या दिवशी सोडलं जातं. त्यामुळे गुरुवारचं व्रत आणि त्याच उद्यापन करावी की नाही याबद्दल महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला  आहे. 

तज्ज्ञ सांगतात की, मार्गशीर्ष गुरुवार आणि सफला एकादशी व्रत हे पूर्णपणे वेगळे व्रत आहे. या दोघांचा काहीही संबंध नाही. ज्या लोकांचा एकादशीचं व्रत नाही त्यांनी उद्यापन करावे आणि नैवेद्य दाखवावा. 

 ज्यांचा एकादशीचा उपवास आहे, त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावे आणि रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत. ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून, उद्यापन करून नैवेद्य सुद्धा दाखवावा आणि ते ताट गाईला द्यावे नंतर उपवास पुढे चालू ठेवावा. यामुळे व्रत विधान पूर्ण होते आणि एकादशीचा उपवासही चालूच राहतो त्यामुळे चिंता करण्याचे काहीही कारण नाही. 

शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने विनाकारण काही लोकांनी संभ्रम निर्माण केलाय. मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन आणि हळदीकुंकू करण्यात काहीही हरकत नाही . 

Post a Comment

0 Comments