Ticker

6/recent/ticker-posts

संत गाडगेबाबाचे स्मारक जागेवरच कायम ठेवून, स्मारकाचा विकास करा. सहकार मंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांना संत गाडगे बाबा विचार मंच तर्फे निवेदन सादर.


         
 ( प्रतिनिधी संजय कडोळे) 
           कारंजा (लाड)
            कारंजा शहरामध्ये स्व. प्रकाश दादा डहाके वन निसर्ग पर्यटन केंद्र या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित  सहकार मंत्री ना.दिलीप वळसे पाटील हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वन पर्यटन केंद्राचे स्व.प्रकाशदादा डहाके निसर्ग पर्यटन केंद्र कारंजा म्हणून नामकरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून संत गाडगेबाबा विचार मंच बहूउद्देशिय संस्था कारंजाचे पदाधिकारी यांनी, "कारंजा उपजिल्हा रुग्णालय समोरील, सध्या नव्याने बांधकाम होत असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात असलेले, परंतु मागील  इ.सन 2006 म्हणजेच गेल्या 17 वर्षांपासून असलेले,आपल्या प्रत्यक्ष कृतीतून समाजाला स्वच्छतेचा मंत्र देणाऱ्या,समाजाला स्वच्छतेचा मंत्र देणाऱ्या,कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे स्मारक आहे त्याच जागेवर कायम ठेवून त्या स्मारकाचा जिर्णोद्धार करून स्मारकाचा विकास करावा.अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांना दिले आहे. तसेच संत गाडगेबाबा विचार मंच बहुउद्देशिय संस्थेच्या पदाधिका ऱ्यांनी, "प्रशासकिय इमारतीचे बांधकाम सुरु असतांना, शासनाकडून ह्या स्मारकाकडे हेतुपुरस्परपणे दुर्लक्ष्य करण्यात येत असल्याचे मंत्रीमहोदयांच्या निदर्शन आणून दिले." यावेळी ना.दिलीप वळसे पाटील यांचेकडे निवेदन देत असतांना व्यासपिठावर,जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. माजी नगराध्यक्ष  दत्तराजजी डहाके , कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमती.सईताई प्रकाशदादा डहाके,देवव्रत डहाके,जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसुफ पुंजानी, राष्ट्रवादीचे नेते जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे,पंचायत समिती सभापती  प्रदीपजी देशमुख, दि अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील कानकिरड, खरेदी विक्री संघ अध्यक्ष देवेन्द्र पाटील ताथोड, माजी नगरसेवक प्रसन्ना पळसकर इत्यादी सगळे मान्यवर देखील उपस्थित होते. 
     संत गाडगे बाबा यांच्या स्मारकासाठी निवेदन देण्यासाठी कारंजा शहरातील संत गाडगेबाबा विचार मंच बहूउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष संतोष धोंगडे,उपाध्यक्ष राजेश चंदन,सचिव रोहित देशमुख,कोषाध्यक्ष चंद्रकांत भोपळे,कार्याध्यक्ष  भारत हांडगे,सर्व सदस्य-सचिन कोळसकर,प्रदीप राऊत,सुरेश तिडके,अजय गुल्हाने,प्रवीण तुपोने,राहुल देशमुख,गौरव चुंबळे,करण पवार,अशोक सोनेकर इत्यादी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून ना.वळसे पाटील मंत्रीमहोदयांना,सत्य परिस्थितीची जाणीव करून दिल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कार्याध्यक्ष भारत धोंगडे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments