Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांना शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

कोपरखैरणे, नवी मुंबई.
वार्ताहर : अनंतराज गायकवाड 
दिनांक 19-8-23, शनिवार

दि. 19 ऑगस्ट रोजी कोपरखैरणे येथील वरिष्ठ हॉटेल या ठिकाणी नवी मुंबईतील पत्रकारांना शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने राज्य सचिव विश्वासराव आरोटे, कोकण विभाग अध्यक्ष राजेंद्र बोडके, यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार, छायाचित्रकार अनंतराज गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. 
यावेळी नवी मुंबईतील अभ्यासू, विचारवंत, पत्रकार सुनील गायकवाड, राजू मीर, गौतम निकाळजे, प्रमोद माने, राजेश जयस्वाल, वरिष्ठ पत्रकार जे. के. पोळ, दिलीप म्हात्रे यांनाही छत्री व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी संदीप महाजन या पाचोरा येथील पत्रकारांना मारहाण केल्याचे निषेधार्थ विचार मंथन करण्यात आले व संघटना या विरोधात येत्या काळात आंदोलन करणार असल्याचे वर्तविले.

Post a Comment

0 Comments