केज-बीड रोडवर असलेल्या एका कला केंद्रात काम करीत असलेल्या नर्तिकेचा तिला लॉजवर नेऊन तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून व नाक तोंड दाबून खून करण्यात आला होता. मात्र सदर प्रकरणी पोलिसांना माहिती न देता मयत महिलेच्या नातेवाईकांना भीती दाखवून गुपचूप प्रेताची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केला होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खूनाचा हा प्रकार उघडकीस आला. अडीच महिन्यानंतर या खुनाला वाचा फुटली आहे. पुरावा नष्ट करणे व धमकी दिल्याचा प्रकरणी कला केंद्राचे मालक, मॅनेजर, लॉजचा मॅनेजर आणि इतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments