Ticker

6/recent/ticker-posts

आदर्श ग्राम वनोजा वनोजा येथील ग्रामसभेत ग्रामस्थांनी समस्यांच्या प्रश्नांची सरबत्ती


मंगरुळपिर ता. प्र. दि. १६

तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा येथे दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या विविध समस्या घेऊन ग्रामसभेत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. ग्रामसभेला सुरुवात होताच ग्रामस्थांनी आपल्या समस्येबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यामध्ये शिवाजीनगर येथे अनेक दिवसांपासून नळा द्वारे पाणीपुरवठा बंद आहे. येथील नाल्यांची साफसफाई का केल्या जात नाही. याबाबत विचारणा केली असता संबंधितांकडून थातूरमातूर उत्तरे दिली जातात. याबाबत ग्राम प्रशासनाला शिवाजीनगर वाशियांकडून एक निवेदनही देण्यात आले आहे.
तसेच ग्रामसभेत वार्षिक अहवाल सादर करण्यात बाबत ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी यांना विचारले असता. त्यांनी याबाबत कुठलेही समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच घरकुल यादी मध्ये पात्र लाभार्थ्यांची यादी, आणि घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांची यादीची माहितीही व्यवस्थित दिली नाही. यावेळी गरजूंना डावलून श्रीमंतांना तसेच एकाच कुटुंबातील व्यक्तींना घरकुल दिल्याचे आरोप ग्रामस्थांन कडुन करण्यात आले. तसेच गावात असेल बरेचसे सार्वजनिक शौचालय हे बंद अवस्थेत आहे. त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही. त्याकडे ग्राम प्रशासनाने लक्ष देऊन सुरू करण्याची मागणी गजानन इंगोले यांनी केली. 

यावेळी ग्रामस्थांच्या समस्यांचे निवारण करणे ऐवजी ग्रामविकास अधिकारी हे अनेक वेळा सभेतून उठून जात होते. सदर ग्रामस्थ आपल्या समस्यांच्या प्रश्नांचे उत्तरे मागणीसाठी अडुन बसले असता. ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामसभा तहकूब करून, पुढील आठवड्यात ग्रामसभा घेवू असे सांगितले आणि तिथून निघून गेले. असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले त्यामुळे ग्रामस्थांना त्यांच्या समस्यांचे कुठलेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे नेमके ग्रामसभेचे आयोजन कशासाठी करण्यात आले होते. हा प्रश्न ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे. जर ग्रामस्थांना येणाऱ्या समस्यांची उत्तरे ग्रामस्थांना मिळत नसतील तर ग्रामसभेचे आयोजन कशासाठी त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ग्रामसभेला बळकटी देण्याचे गरज आहे.

Post a Comment

0 Comments