Ticker

6/recent/ticker-posts

संकल्प नशामुक्ती अंतर्गत ८ नशेखोरांवर कारवाई, न्यायालयाने ठोठावला दंड


प्रतिनिधी श्रावणी कामत 

मा. पोलीस अधिक्षक श्री. अंकित गोयल सो पुणे ग्रामीण व मा. सहा. पोलीस अधिक्षक, श्री सत्यासाई कार्तिक साो लोणावळा उपविभाग यांचे संकल्पनेतुन राबविण्यात येत असलेल्या "संकल्प नशामुक्ती' या अभियानाच्या माध्यामातुन लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीत 'गांजा' या मादक पदार्थाचे सेवन करीत असताना मिळुन आलेल्या ८ नशेखोरांवर गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधि. १९८५ अंतर्गत कारवाईचा बडगा उगारत लोणावळा शहर पोलीसांनी कारवाई करत तात्काळ तपास करुन दोषारोप पत्रासह आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना प्रत्येकी १०००/- रु दंड व दंड न भरल्यास ७ दिवसांचा साधा कारावास अशी शिक्षा ठोठावल्याने नशेखोरांचे धाबे दणाणले असुन यापुढे कोणी नशेखोर दिसुन आल्यास तात्काळ लोणावळा शहर पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच नागरीकांनी प्रत्येक प्रकारच्या नशे पासुन अलिप्त राहुन आपली व आपल्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहान करण्यात येत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. अंकित गोयल सो पुणे ग्रामीण यांचे आदेशान्वये व मा. अपर पोलीस अधिक्षक साो श्री मितेश गट्टे, मा. सहा. पोलीस अधिक्षक, श्री. सत्यासाई कार्तिक साो लोणावळा उपविभाग यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक सिताराम डुबल लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांचे सुचना नुसार पोहवा / ८८२ जयराज पाटणकर, पोना / ११९३ हनुमंत शिंदे, पोशि/३७३ गायकवाड, पोशि/ १२२३ पाटिल यांनी केली असुन कोर्ट पैरवी म्हणुन पोना / १०२७ सुधीर डुंबरे यांनी कामकाज पाहिले आहे.

Post a Comment

0 Comments