Ticker

6/recent/ticker-posts

गांजाचे सेवन केलेल्या एकूण११ लोकांचे विरोधामध्ये लोणावळाग्रामीण पोलिसांनी केली धडाकेबाज कारवाई.


प्रतिनिधी श्रावणी कामत.

संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत मा. पोलीस अधीक्षक सो. पुणे  ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली व मा. सत्यसाई कार्तीक सहा. पोलीस अधीक्षक गो. उपविभागीय पोलीस अधिकारी साो. लोणावळा विभाग, लोणावळा यांचे संकल्पनेतून पुणे जिल्हयातील लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गांजाचे सेवन करणारे लोकांवर कारवाई करीता दि. २२/०८/२०२३ रोजी पोलीस ठाण्याकडून नेमलेल्या विशेष पथकाकडून कारवाई करीत एकुण ११ गांजाचे सेवन करणारे लोकांच्याविचेरुद्ध एन.डी.पी.एस. कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले त्यांना मा. न्यायदंडाधिकारी सो, वडगांव मावळ यांचेसमक्ष हजर केले असता मा. न्यायदंडाधिकारी साो. यांनी दंडाची व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली

यापूर्वी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अशाप्रकारच्या ४ केसेस करण्यात आल्या आहेत. गांजाची वाहतूक व विक्री बाबत धकड कारवाई करीत २० किलो गांजा व वाहतूक करणारी दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.

यापुढेही गांजा वाहतूक व विक्री करण्याच्या तसेच गांजा सेवन करणारे लोकांची माहिती मिळवून अशाप्रकारे विशेष पथके नेमून कारवाई करणार असल्याबाबत पोलीस निरीक्षक / श्री. किशोर धामळ यांनी माहिती दिली आहे.

सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधीक्षक डॉ. अंकीत गोयल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. मितेश गट्टे, सहा. पोलीस अधीक्षक मा. सत्यसाई कार्तीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. किशोर धुमाळ लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, सहा. पोलीस निरीक्षक / किशोर शेवते, सहा. पोलीस निरीक्षक / देविदास करंडे, पोलीस उपनिरीक्षक/ भारत भोसले, पोलीस निरीक्षक / सागर अरगडे, सहा. पोलीस उपनिरीक्षक / युवराज बनसोडे, पो. हवा. / जय पवार, पोलीस अंमलदार / गणेश होळकर, केतन तळपे, राहुल खैरे, संजय पंडीत, सतीश कुदळे, अमोल गवारे पोलीस मित्र अमित भदोरीया यांनी सदरची कारवाई केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किशोर धुमाळ यांनी माहिती दिली आहे.

Post a Comment

0 Comments