Ticker

6/recent/ticker-posts

स्पर्धा परीक्षा शुल्क वाढीविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी!

युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शुल्क वाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली.वाशिम:- स्पर्धा परीक्षा शुल्क वाढी विरोधात आज वाशिम मध्ये विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून सरकारचा निषेध व्यक्त केला. या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शुल्क वाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली.

नोकरीचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी डोळ्यात तेल घालून अभ्यास करतात. मात्र राज्य सरकार विद्यार्थ्यांची खासगी कंपनी मार्फत लूट करीत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनातुन आरोप होत आहेत. राज्यात विविध पदासाठी नोकर भरती प्रक्रिया राबवित आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अत्यंत माफक परीक्षा शुल्क असताना शिपाई पदाच्या भरतीसाठी एक हजार रुपये शुल्क आकारून विद्यार्थ्यांची राज रोस पणे होणारी लूट थांबविण्यासाठी आज ८ ऑगस्ट रोजी शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेना विद्यार्थी आघाडीच्या वतीने शुल्क वाढी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विद्यार्थिनी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्याच्या हातात शुल्क वाढ कमी करा, पठाणी वसुली थांबवा, असे फलक होते.


Post a Comment

0 Comments