दिनांक 27-8-23, रविवार
कोपरखैरणे, नवी मुंबई.
वार्ताहर : अनंतराज गायकवाड
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ द्वारे नवी मुंबईत राज्य संघटक मा. संजय भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरखैरणे येथील माथाडी ट्रस्ट हॉस्पिटल मधील रुग्णांना मिठाईवाटप करण्यात आले.
नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण, कोकण विभाग कार्याध्यक्ष राजेंद्र बोडके, सल्लगार
कुंडलिक कांनगुडे, खजिनदार
राजू मीर, पत्रकार प्रमोद माने, वरिष्ठ पत्रकार जे. के. पोळ,
'दै. आमची मुंबई' चे प्रतिनिधी सुनील गायकवाड, अरुण गुप्ता, 'प्रथम न्याय' बुरो चीफ नवी मुंबई विष्णू बुरे, 'खबरे आज भी' चे सुरेंद्र सरोज, अरुण गुप्ता, फोटो जर्नलिस्ट 'दै निर्मल विदर्भ' चे प्रतिनिधी अनंतराज गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments