दिनांक 27-8-23, रविवार
कोपरखैरणे, नवी मुंबई.
वार्ताहर :
अनंतराज गायकवाड
संभाजी ब्रिगेड नवी मुंबई कार्यकारणी तर्फे जिल्हाध्यक्ष शिवश्री मारुतीराव खुटवड यांच्या नेतृत्वात कोपरखैरणे सेक्टर 1 मधील मध्यवर्ती कार्यालयात स. 11 ते दु. 2 वाजेपर्यंत मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर राबविण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांसह स्थानिक रहिवाशांनी या शिबिराचा लाभ घेतला.
हेल्दी आणि हॅप्पी कम्युनिटी (Healthy And Happy community) यांच्या वतीने वेलनेस कोच (wellness coach) हेल्थ अवेअरनेस प्रोग्रॅम (health awareness program) आयोजित करून त्या ठिकाणी एकूण 39 महिलासह पुरुषांची आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक
महादेव पवळे सर, बद्रीनाथ सर सोनाली पवळे, श्रीकांत जी, तसेच मेधा वाघमारे, प्रदीप घार्गे, स्नेहल घार्गे आदींनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे संघटक सल्लागार सिद्धार्थ जाधव, नवी मुंबई प्रवक्ता सचिन वाघ, सरिता सकपाळ, कविता खन्ना मॅडम, माजी सैनिक दळवी, तसेच जनार्दन कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments