वि.न्यायालयाद्वारे विविध प्रकरणांमध्ये काढण्यात येणाऱ्या समन्स प्रणालीमध्ये गतिमानता व पारदर्शकपणा यावी आणि समन्सची बजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी वाशिम पोलीस दलातर्फे नव्याने कार्यान्वित ‘ई-समन्स प्रणाली’चे उद्घाटन मा.न्यायमूर्ती श्री.जि.ए.सानप, उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर तथा पालक न्यायमूर्ती, वाशिम जिल्हा यांच्याहस्ते दि.०५.०८.२०२३ रोजी शासकीय विश्रामगृह, वाशिम येथे संपन्न झाले.
मा.न्यायालयाकडून काढण्यात येणारे समन्स/वारंट बजावणीसंदर्भात येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना म्हणून वाशिम पोलीस दलातर्फे ‘ई-समन्स प्रणाली’ हि अभिनव प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ई-समन्स प्रणालीद्वारे समन्स/वारंट च्या पर्यवेक्षणाचे डिजिटलायझेशन करण्यात आले असून तीन पातळ्यांवर समन्स/वारंट बजावणीचे पर्यवेक्षण होणार आहे. सर्वप्रथम समन्स/वारंट हे संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना अंमलबजावणीसाठी प्राप्त होणार असून ते सदर समन्स/वारंटची अंमलबजावणी करून घेऊन तसा अहवाल मा.न्यायालयास ई-समन्स प्रणालीद्वारे सादर करतील.
पो.स्टे.स्तरावर समन्स/वारंट प्रलंबित राहिल्यास त्याची माहिती संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी व नंतर अपर पोलीस अधीक्षक, वाशिम यांना प्राप्त होते. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांना स्थानिक पातळीवर समन्स/वारंट बजावणी व ज्यांची बजावणी झाली नाही त्या समन्स/वारंट बाबतीत येणाऱ्या अडी-अडचणींचा प्रत्यक्ष आढावा घेऊन मार्गदर्शन व सूचना करणे सोयीचे होणार आहे. सदर ‘ई-समन्स प्रणाली’वर वि.न्यायालयामार्फत समन्स/वारंट अपलोड केली जातील व त्यांच्या अंमलबजावणीसंदर्भातील पूर्तता अहवाल पोलिसांकडून अपलोड केला जाणार आहे. समन्स/वारंट बजावणी अधिक जबाबदारपणे व कार्यक्षमतेने करण्यात सदर प्रणाली मोलाची मदत करेल. ट्रायल मॉनिटरिंग सेल, वाशिमद्वारे दररोज ‘ई-समन्स प्रणाली’वर देखरेख ठेवली जाणार असून त्यावर अपर पोलीस अधीक्षक, वाशिम हे पर्यवेक्षण करणार आहे.
सदर ‘ई-समन्स प्रणाली’चे उद्घाटन मा.न्यायमूर्ती श्री.जि.ए.सानप, उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर तथा पालक न्यायमूर्ती, वाशिम यांच्याहस्ते पार पडले. त्याप्रसंगी मा.श्री.आर.पी.पांडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, वाशिम, मा.श्री.एन.आर.प्रधान, जिल्हा सत्र न्यायाधीश, वाशिम, मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरूळपीर श्रीमती नीलिमा आरज व मा.न्यायालयीन अधिकारी/कमर्चारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांची उपस्थिती लाभली.
(जनसंपर्क अधिकारी)
पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम.
0 Comments