समस्त पत्रकार बांधवांनी धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
वाशिम पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालविणे आणि पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करन्याच्या मागणी साठी वाशीम जिल्हयातील सर्व पत्रकारांनी संघटीत होवुन वाशिमच्या एकदिवशीय धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन वाशिम जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे यांनी केले आहे.
दरम्यान सदर एक दिवशीय धरणे आंदोलन दि.१७ ऑगष्ट गुरुवारला रोजी सकाळी १०:३० ते दुपारी २ वाजेपर्यंत स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक यांच्या पुतळ्या जवळ करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये सर्वच पत्रकार संघटनांच्या प्रतिनीधींनी उपस्थित रहावे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रात ८ नोव्हेंबर २०१९ पासून पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला आहे.. हा कायदा करणारे महाराष्ट्र हे। देशातील पहिले राज्य आहे याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे.. महाराष्ट्राचा हा कायदा पुरेसा सक्षम आणि चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने तो आता कुचकामी ठरला आहे. राज्यात गेल्या चार वर्षात जवळपास २०० पत्रकारांवर झाले किंवा त्यांना धमक्या, शिविगाळ केली गेली. मात्र केवळ ३७ प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लागू केल्याने आणि त्यातील एकाही प्रकरणात आरोपीला शिक्षा न झाल्याने या कायद्याची उपयुक्तता संपली असून कायदयाची भितीच समाजकंटकांच्या मनात उरली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा चिंता वाटावी एवढ्या मोठ्या संख्येने पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत. अलिकडेच पाचोरा येथील एका पत्रकारास आमदार किशोर पाटील यानी अगोदर शिविगाळ केली आणि दुसर्या दिवशी आपल्या गुंडाकरवी त्याच्यावर हल्ला चढविला. हे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले, ऐकले आहे. असे असले तरी मारहाण करणार्या गुंडावर किंवा शिविगाळ आणि धमक्या देणार्या आमदार किशोर पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला नाही.
पत्रकारांवर जे हल्ले होतात त्यातील ७५ टक्क्यावर हल्ले हे राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्याकडून होतात हे वास्तव आकडेवारीसह समोर आलेलं आहे.. मग अशा प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होतात आणि पोलीस पत्रकार संरक्षण कायद्याचं कलम न लावता साथी `एनसी ' दाखल करून हा विषय बंद करून टाकतात असे प्रकार वारंवार आणि सर्वत्र दिसून येत आहेत. हे थाबलं पाहिजे, आणि पत्रकारांना निर्भय वातावरणात काम करता आलं पाहिजे.
सरकारकडे आमच्या प्रामुख्यानं दोन मागण्या आहेत, पत्रकारावर हल्ला झाल्यानंतर पोलीस पत्रकार संरक्षण कायद्याच कलम लावायला टाळाटाळ करीत असतील तर संबंधीत अधिकार्यावर कारवाई व्हावी, जेणे करून अंमलबजावणीतील मुख्य अडसर दूर होईल. दुसरी मागणी अशी आहे की, पत्रकारांवरील हल्ल्याचे सर्व खटले जलदगती न्यायालयामार्फत चालविण्यात यावेत. जेणे करून पत्रकारांना न्याय मिळू शकेल...
पत्रकारांवरील वाढते हल्ले, पत्रकार संरक्षण कायदयाची अंमलबजावणी करण्यास होत असलेली टाळाटाळ आणि आमदार किशोर पाटील यांच्या अरे रावीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील ११ प्रमुख पत्रकार संघटनांचे सर्व पत्रकार गुरुवारी राज्यभर निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करीत आहेत.. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात व तालुक्यात हे आंदोलन होत आहे.. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पत्रकारांना रस्त्यावर उतरण्याची वेळ यावी हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही असे जेष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे यांनी म्हटले आहे.
0 Comments