Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री यांनाजिल्हाअधिकारी यांच्यामार्फत तक्रार सादर १४ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण


 नगरपरिषद मंगरूळपीर अंतर्गत शहरात विकास कामे चालू असुन ती सर्व कामे अंदाज पत्रानुसार न करता थातूरमातूर करून शासनाच्या निधीचा दुरुपयोग करत भ्रष्ट व्रुत्ती चा वापर होत आहे त्यामुळे संबंधित मुख्याधिकारी व बांधकाम अभियंता सह कंत्राटदार यांच्यावर कार्यवाही व्हावी अन्यथा
१४ ऑगस्ट रोजी पासून तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार . शहरात 2022 पासून जेवढेही सिमेंट चे रोड झालेले आहे एस्टिमेट नुसार न करता थातूरमातूर पद्धतीने काम करून निधीचा दुरुपयोग झाला आहे आहे. तरी आपण या कामाच्या कॉलिटी कंट्रोल मार्फत या  शहरात प्रशासकीय राजवटीत झालेले संपूर्ण विकास कामाची चौकशी करून संबंधित मुख्याधिकारी व बांधकाम अभियंता व ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी.सध्या अशोक नगर मध्ये व शहरात विविध ठिकाणी जे काम चालू आहे त्या कामाची कॉलिटी कंट्रोल मार्फत ऑन द स्पॉट चौकशी केल्याशिवाय कामाचे देयक देण्यात येऊ नये. शहरात अनेक ठिकाणी हॅन्ड पंप नादुरुस्त आहे. नळाला आठ  दिवस पर्यंत पाणी मिळत नाही .सार्वजनिक शौचालय आहे स्वच्छता नाही फक्त घाणीचा साम्राज्य पसरले आहे. शहरात मच्छराचे प्रमाण वाढले नागरिकाच्या  आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या पावसाळ्या  असल्यामुळे ठिकठिकाणी घाण पाणी साचले आहे. सार्वजनिक शौचालय स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले आहे स्वच्छता करण्यात यावे नगरपरिषद याबाबत अक्षम दुर्लक्ष करत असल्याने  वारंवार तोंडी व लेखी निवेदन देऊ नाही काम केले जात नाही धूर फवारणी होत नाही मुलभूत  सुविधा कडे लक्ष न देता ठेकेदाराचे बिल काढण्यात अधिकारी वर्ग व्यस्त दिसून येत आहे.  नागरिकाला मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे
  येणाऱ्या 14 ऑगस्ट रोजी पासून मंगरूळपीर तहसील कार्यालय परिसरात आमरण उपोषणाला बसेल व भविष्यात उद्भवणाऱ्या प्रसंगाला आपण खुद्द जबाबदार असाल असे निवेदनात नमूद केले आहे या निवेदनाच्या प्रतिलिपी मा.आयुक्त साहेब विभागीय कार्यालय अमरावती, जिल्हाधिकारी साहेब जिल्हाअधिकारी कार्यालय वाशिम, मा.पोलीस अधीक्षक साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय वाशिम,मा. उपविभागीय अधिकारी साहेब व प्रशासन अधिकारी
तहसील कार्यालय मंगरूळपीर,
मा पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन मंगरूळपीर इत्यादींना निवेदन दिले आहे. वरिष्ठ अधिकारी 14 ऑगस्ट आधी कारवाई करतील का व मंगरूळपीर नगर परिषदेचा होत असलेला भ्रष्टाचार थांबेल का अशी चर्चा जनसामान्यात जोर धरत आहे.

Post a Comment

0 Comments