ऐरोली मतदार संघाचे प्रथम आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष मा. संदीप नाईक यांचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून संदीप नाईक यांच्या जवळचे सहकारी असलेले समाजसेवक राजेंद्र होवाळे संकल्पनेतून मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोपरखैरणे सेक्टर 2 मधील धन्वंतरी क्लिनिक या ठिकाणी डॉ. वर्षा सिंग यांच्या निदर्शनात स्थानिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी मोफत पावसाळ्यातील साथीचे रोग तपासणी, औषधोपचार, तसेच मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास नवी मुंबईतील अनेक मान्यवरांनी भेट दिली तसेच आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत सिद्धार्थ जाधव, पत्रकार अनंतराज गायकवाड यांनी भेट देऊन सदिच्छा व्यक्त केल्या.
नवी मुंबईतील सामाजिक व राजकीय पटलावर सातत्याने सत्कार्य करणाऱ्या समाजसेवक राजेंद्र होवाळे यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
0 Comments