मंगरूळपीर :- स्थानिक श्री वसंतराव नाईक कला व श्री अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालय मंगरूळपीर येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. प्रमोद तायडे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने नुकतीच 39 व्या दीक्षांत समारंभात मा.राज्यपाल श्री.रमेश भैस यांच्या शुभहस्ते राज्यशास्त्र या विषयात आचार्य (पीएचडी) पदवी देऊन सन्मानित केले आहे. त्यांचा पीएचडी चा विषय होता 'शाहू महाराज यांनी केलेल्या सामाजिक व राजकीय कार्यांचे विश्लेषणात्मक अध्ययन' (विशेष संदर्भ 1874 ते 1922) या विषयावर त्यांनी राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तथा सिनेट सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय कारंजा लाड येथील प्राचार्य डॉ.सुभाष गवई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध सादर केला तो विद्यापीठांनी मान्य करून मौखिक चाचणी करिता अलिबाग येथून आलेले. बाह्य परीक्षक डॉ.ईश्वरदास कोकणे, डॉ.दीपक स्वरगे यांनी प्रा. डॉ.प्रमोद तायडे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य (पीएचडी) पदवी देऊन सन्मानित करावे.अशी घोषणा केली होती. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ. प्रमोद येवले, प्र- कुलगुरू डॉ,प्रसाद वाडेगावकर,कुलसचिव,डॉ.तुषार देशमुख व विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांचे बी.ए. पर्यंतचे शिक्षण श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय अंजनगाव सुर्जी व पदव्युत्तर शिक्षण विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती येथे झाले. त्यांनी राज्यशास्त्र विषयात नेट व सेट या प्राध्यापक पदासाठीच्या दोन्ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. तसेच त्यांनी समाजशास्त्र या विषयातूनही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. घरची परिस्थिती अत्यंत सामान्य असलेले प्रा.प्रमोद तायडे यांचा पीएचडी पर्यंतचा प्रवास हा सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यांचे वडील रामकृष्ण तायडे व आई सौ.शशिकला तायडे हे निरीक्षर असूनही त्यांनी मात्र आपल्या मुलाला उच्च शिक्षण घेण्याची सतत प्रेरणा दिली.सध्या ते श्री वसंतराव नाईक महाविद्यालय मंगरूळपीर येथे राज्यशास्त्र विषयातील सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. डॉ. प्रमोद तायडे हे मूळचे अंजनगाव सुर्जी तालुक्यातील बोराळा (धनेगाव) येथील रहिवासी आहे. त्यांनी त्या गावातून पीएचडी पदवी प्राप्त करण्याचा प्रथम बहुमान मिळवला आहे. त्यांना आचार्य (पीएचडी) पदवी प्राप्त झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अ.राठोड साहेब यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले आहे. यावेळी मानद व्यवस्थापकीय कार्यकारीअधिकारी डॉ.एल.के करांगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम.वडघुले तसेच महाविद्यालयातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments