Ticker

6/recent/ticker-posts

दर्पण पत्रकार व संपादक फाउंडेशनचा समाजसेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा शेगावात उत्साहात संपन्न. देश घडवण्यासाठी समाजसेवक पत्रकारांनी पुढे यावे! समाजसेवक गजानन हरणे.

 
शेगाव.............................. पत्रकारांसाठी झटणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या नागपूर येथील दर्पण पत्रकार व संपादक फाउंडेशन च्या वतीने पत्रकारिता व विविध सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा समाजसेवा गौरव पुरस्कार  श्रीसत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या शेगाव नगरीमध्ये पार पडला.या कार्यक्रमाला संबोधताना देश घडवण्यासाठी समाजसेवक व पत्रकार यांनी पुढे यावे असे आव्हान ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे यांनी केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक माया दामोदर यांनी केले .तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा गटनेते राजेश मिश्रा हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक , तथा निर्भय बनो जणआंदोलनाचे संयोजक गजानन हरणे, सुशील पांडे संस्थापक अध्यक्ष दर्पण पत्रकार व संपादक फाउंडेशन , राष्ट्रीय सचिव संजय तिवारी, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेश शुक्ला, पोलीस टाईम 24 चे मुख्य संपादक राजेंद्र पाठक,महेश दिपके केंद्रीय सोशल मीडिया प्रभारी पतंजली ग्रामोद्योग न्यास हरिद्वार, मुकेश मुरूमकर उपजिल्हाप्रमुख शिवसेना तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, रूपालीताई वाकोडे महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , सारिका रेणू पहुळकर महिला संघटिका शिवसेना, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुभहस्ते विविध वृत्तपत्राचे संपादक पत्रकार तसेच समाजसेवक यांना समाजसेवा गौरव पुरस्कार देऊन दर्पण पत्रकार व संपादक फाउंडेशनच्या वतीने शेगाव येथील विश्रामगृहामध्ये दिनांक 26 ऑगस्ट 2023 ला शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
 त्यामध्ये राजेंद्र काळे जिल्हा प्रतिनिधी देशोन्नती, धनराज सनाने क्राईम रिपोर्टर देशोन्नती व विभागीय प्रतिनिधी पोलीस टाईम, सदानंद शिरसाट हॅलो हेड प्रमुख दैनिक लोकमत खामगाव बुलढाणा, ललित पांडे रेल्वे एकता मजदूर संघ, मयूर निकम जिल्हा प्रतिनिधी झी 24 तास , कृष्णा सपकाळ समूह सल्लागार लाईव्ह चिखली बुलढाणा, ज्ञानेश्वर ताकोटे पाटील संपादक बातम्या 24 तास न्यूज जिल्हा विशेष प्रतिनिधी बुलढाणा लाईव्ह, तसेच समाजसेवक शिवाजीराव जाधव रुग्णसेवा युथ हिंदू प्रतिष्ठान खामगाव, पापाचंद्र पवार अध्यक्ष सेवादल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, फिरोज हसन खान संस्थापक अध्यक्ष जनधन ग्राहक कल्याण परिषद, ज्योती बावस्कर, रंजना चव्हाण, जयश्री देशमुख, लूकमान शाह उस्मान शहा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र लढा पत्रकार संघटना, फुलाबाई राठोड, शुद्धमती निखाडे, स्नेहल कांबळे, राखीताई पाटेकर, आधी मान्यवरांचा गौरव करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिका माया दामोदर यांच्या "अनुभूती" या पुस्तकाचे प्रकाशन सुद्धा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन संगीता तांबूसकर यांनी तर आभार प्रदर्शन संजय तिवारी राष्ट्रीय सचिव दर्पण पत्रकार व संपादक फाउंडेशन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सचिन लिमसे, शिवप्रकाश डूले, अमित सहाणी, स्वप्निल बावनकर, नितीन भाई, टीना गौर, जितेंद्र पांडे, अरुण मिश्रा आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विदर्भातील अनेक गणमान्य पत्रकार संपादक समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रम शांततेत परंतु उत्साहात पार पडला. कार्यक्रमामध्ये संगीत रजनीचा कार्यक्रम सुद्धा उत्कृष्ट पार पडला. अनेक गायक, गायिकांनी आपली सेवा सादर केली. उपस्थितत्यांनी  त्याचा  मनसोक्त आनंद घेतला. कार्यक्रमाची सांगता चहा नाश्ताने झाली.                                       

Post a Comment

0 Comments