Ticker

6/recent/ticker-posts

माजी सैनिकांच्या सन्मानार्थ, महसूल सप्ताहानिमित्त,कारंजा तहसिल कार्यालयाकडून, "सैनिकं हो तुमच्यासाठी" हा कार्यक्रम संपन्न . . !

 
कारंजा ( प्रतिनिधी संजय कडोळे) 

कारंजा तहसिल कार्यालयाचे कर्तव्यतत्पर तहसिलदार कुणाल झाल्टे हे कारंजा तहसिल कार्यालयात रूजू झाल्यापासूनच,शासनाचे विविध लोकाभिमुख कार्यक्रम उत्कृष्टपणे राबवीत आहेत.त्यामुळे तहसिल प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.                
             चालू आठवड्यात,महाराष्ट्र शासनाकडून,महसूल सप्ताह राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने कारंजा तहसिल कार्यालयाकडून,शनिवार दि. 05 ऑगष्ट रोजी सकाळी 09:00 वाजता,विरमाता  आणि माजी सैनिकांच्या सन्मानार्थ, विरमाता आणि माजी सैनिकांना, सन्मानपूर्वक निमंत्रण देऊन "सैनिक हो तुमच्या साठी"  हा देशभक्तीपर   कार्यक्रम घेण्यात आला.या  कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी,कारंजा  महसूल उपविभागाचे,उप विभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे आणि प्रमुख उपस्थितीमध्ये, कारंजा तहसील कार्यालयाचे तहसिलदार कुणाल झाल्टे उपस्थित होते.                              याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देशाचे संरक्षणाकरीता सेवा देणाऱ्या,माजी सैनिक आणि विरमातांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ललितकुमार वऱ्हाडे आणि प्रमुख उपस्थित असलेले कारंजा तहसीलचे तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.माजी सैनिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या आणि सर्व समस्यांचे निरषण करण्याचे आश्वासन दिले.                 सदर कार्यक्रमाला,महसूलचे नायब तहसिलदार विनोद हरणे, निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार,लक्ष्मण बनसोडे, नायब तहसिलदार विकास शिंदे तसेच कारंजा येथील माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन अतुल एकघरे,उपाध्यक्ष मधुकर खाडे यांचेसह माजी सैनिक आणि विरमाताची उपस्थिती होती.     
 महसूल सप्ताहांतर्गत घेण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राहूल वरघट यांनी केले तर आभार प्रदर्शन विकास शिंदे (ना. त.) यांनी केले.                   तहासिल कार्यालयातील कार्यक्रमानंतर,मानोरा मार्गावर उपस्थित मान्यवर,माजी सैनिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.महसूल सप्ताहानिमित्ताने,कारंजा तहसिल कार्यालयाने घेतलेल्या या विशेष कार्यक्रमा बद्दल माजी सैनिकांसह विरमातांनी आनंद व्यक्त करीत कार्यालयाचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments