Ticker

6/recent/ticker-posts

श्री धानोरकर आदर्श विद्यालय येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा


 श्री धानोरकर आदर्श विद्यालय येथे 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला व विद्यालयांमध्ये विविध स्पर्धा व खेळाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे प्राचार्य श्री मंगेश भाऊ धानोरकर  यांनी स्वीकारले  तर प्रमुख अतिथींचे स्थान  विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सौ अंजली धानोरकर मॅडम व श्री उचित सर यांनी भूषविले
 कार्यक्रमाची सुरुवात  प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून करण्यात आली
 विद्यालयामध्ये विविध खेळ लगोरी,खोखो,धावण्याची स्पर्धा, तळ्यात- मळ्यात ,कबड्डी अशा प्रकारचे विविध खेळ घेण्यात आले
 कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री उचित  यांनी खेळाबद्दल माहिती सांगून खेळ आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे आहेत याची माहिती सांगितली तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मंगेश भाऊ धानोरकर सर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांनी कशाप्रकारे हॉकी या स्पर्धेमध्ये असंख्य  सुवर्णपदक मिळवून भारताचा जगामधील  खेळामध्ये कसा नावलौकिक मिळवला याची माहिती सांगितली 
 कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने  उपस्थित होते  
 कार्यक्रमाचे संचालन श्री सावके  व आभार प्रदर्शन सौ होले  मॅडम यांनी मानले

Post a Comment

0 Comments