दि. 13-8-23, रविवार.
कोपरखैरणे, नवी मुंबई
वार्ताहर :
अनंतराज गायकवाड
कोपरखैरणे, नवी मुंबई
वार्ताहर :
अनंतराज गायकवाड
दि. 13-8-23, रविवार.
नवी मुंबईतील गॅस वितरक एजन्सी चे कर्मचारी लोक डाऊन च्या काळापासून घरपोच सिलेंडर पोचविण्याच्या सेवेतून ग्राहकांबरोबर मुजोरपणा करीत असल्याचे निदर्शनात आले आहे.
विशेषतः गावठाण परिसरात घरे दाटीवाटीच्या ठिकाणी असल्याने तसेच गावातील इमारती तीन ते चार मजले असल्याने या कर्मचाऱ्यांना जीने चढून जावे लागत असतात व त्यासाठी काही ग्राहक स्वखुशीने 40 ते 50 रुपये अधिक देतात, तर न परवडणाऱ्यांची नामुष्की होते. यातूनच वाद विवाद होत असतात व ज्या ग्राहकांबरोबर वाद होतात अशा ग्राहकांना गॅस बुकिंग करून देखील गॅस उशिरा देणे, महिलांना घरातील कामे सोडून सकाळी गावातील मध्यवर्ती ठिकाणी येऊन गाडीची वाट पाहणे अशा गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागतो सध्या गॅसची किंमत साडेअकराशे असून बाराशे रुपये मोजावे लागतात. गॅस बुकिंग करून देखील दोन दोन दिवस गॅसची वाट पहावी लागत आहे.
वाशी जुहू नगर येथील नाकोडा गॅस एजन्सी मध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांची हेल्पलाइनवर तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही. घरातील पुरुष वर्ग कामावर जात असल्याने घरात वजनदार असलेला गॅसचा बाटला उचलणे महिलांना शक्य होत नाही याच्या बदल्यात महिला त्यांना स्वखुशीने अधिक पैसे देत असून देखील काही मुजोर कर्मचारी हुज्जत घालत असतात. तसेच एजन्सी द्वारे सर्वे करण्यास येणारे कर्मचारी देखील गॅस चेक करण्यास येतात व हा सर्वे फ्री असल्याचे सांगून सामान लावून देऊन सर्विस चार्ज च्या नावावर अधिक पैसे घेतात. या सर्व बाबी अत्यावश्यक असल्या तरी कधी कधी मध्यमवर्गीय लोकांकडे पैसे नसतात अशावेळी या कर्मचाऱ्यांबरोबर शाब्दिक चकमकी उडतात, हे टाळण्यासाठी सर्वे होण्याअगोदर फोन करून यावे, मोबाईल द्वारे किंवा जाहिरातीद्वारे सुचित करण्यात यावे. अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सिलेंडर पोहोचविणारे कर्मचारी मेहनत करतात, परंतु काही कर्मचारी उद्धटपणाने वागत असल्याने चांगल्या कर्मचाऱ्यांचे देखील नाव खराब होत आहे. एकीकडे महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे व ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांवर व संबंधित एजन्सीवर वेळीच कारवाई होणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी कोपरखैरणे येथील भारतगॅस एजन्सीचा भोंगळ कारभार अशाच कारणांमुळे उघड झाला होता.
_" दोन दिवसापूर्वी गॅस बुक करून, ओटीपी मिळालेला असून देखील गॅस घरी आलेला नाही काल गॅस वाला म्हणाला की उद्या मेसेज मिळाल्यावर सकाळी घेऊन येतो परंतु एक वाजेपर्यंत त्याने गॅस दिला नाही किती वेळ वाट पाहावी तसेच तो म्हणतो तुमच्याकडे दोन दोन सिलेंडर असून देखील तुम्ही बुकिंग ऐनवेळी करता, परंतु आज घडीला महागाई वाढल्याने बाराशे रुपये पर्यंतचा गॅस परवडत नाही व आर्थिक अडचणीमुळे कधी कधी एकाच सिलेंडरवर भागवावे लागते. "_
*सोनल गायकवाड.* गृहिणी, सेक्टर 19 कोपर खेरने गाव.
नवी मुंबईतील गॅस वितरक एजन्सी चे कर्मचारी लोक डाऊन च्या काळापासून घरपोच सिलेंडर पोचविण्याच्या सेवेतून ग्राहकांबरबर मुजोरपणा करीत असल्याचे निदर्शनात आले आहे.
विशेषतः गावठाण परिसरात घरे दाटीवाटीच्या ठिकाणी असल्याने तसेच गावातील इमारती तीन ते चार मजले असल्याने या कर्मचाऱ्यांना त्या चढून जावे लागत असतात व त्यासाठी काही ग्राहक स्वखुशीने 40 ते 50 रुपये अधिक देतात, तर न परवडणाऱ्यांची नामुष्की होते. यातूनच वाद विवाद होत असतात व ज्या ग्राहकांबरोबर वाद होतात अशा ग्राहकांना गॅस बुकिंग करून देखील गॅस उशिरा देणे, महिलांना घरातील कामे सोडून सकाळी गावातील मध्यवर्ती ठिकाणी येऊन गाडीची वाट पाहणे अशा गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागतो सध्या गॅसची किंमत साडेअकराशे असून बाराशे रुपये मोजावे लागतात. गॅस बुकिंग करून देखील दोन दोन दिवस गॅसची वाट पहावी लागत आहे.

0 Comments